बीड

बीड येथील नववधुची एयर स्ट्राईक ! मध्यरात्रीच चिमणी उडाली

नव वधु चे फिल्म स्टाइलने प्रियकराला पलायण

बीड येथील वधु मुलीचा धाडसी निर्णय : माता पित्यासह नातेवाईक आप्तेष्ठ व पतिच्या हातावर दिली तुरी ! शेजारच्या गावातील प्रियकरा सोबत नव वधु पळाली ! कुटुंबीयांच्या प्रतिष्ठेवर फिरवला मध्यरात्री नांगर ,बीड जिल्ह्यातील चमत्कारिक घटणा 

वेगवान मराठी प्रतिनिधी केशव डी मुंडे बीड –बीड दिनांक-13 मे 2025 प्रत्येक मायबापांनी पाहिलेले स्वप्न असतं की आपल्या देखत मुला बाळांचे हात पिवळे होऊण त्यांचा सुखी संसार व्हावा आणि आपल्या कर्त्वयातुन पार पडावे एवढीच माफक अपेक्षा आसते,परंतु सध्या काय घडेल याचा नेम नाही ! आशीच घटणा बीड मध्ये घडली आसुण या घटणेची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे…

प्रेम आणि युद्धात सगळ माफ आसते आसे म्हणतात पण मायबापाच्या इज्जतीचे लक्तरे पार वेशी टांगुन समाज तोंड दाखवायच्या लायक न ठेवणे हि बाब सामाजिक दृष्ट्या अत्यंत गंभीर आहे.अशीच एक अजब घटना आता समोर आली आहे. अंगावरची हळद उतरण्याआधीच नवरी प्रियकरासोबत पळून गेल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये घडली आहे.

नातेवाईकां कडून वधूची शोधाशोध सुरू झाली. मात्र, वधू सापडली नाही. अखेर वधूच्या पित्याने या प्रकरणी तक्रार देखील नोंदवली. केज तालुक्यात ही घटना घडली आहे.

9 मे रोजी वडिलांनी लेकीचं धुमधडाक्यात लग्न लावलं, 10 मे रोजी नवरीने देवदर्शन देखील केलं,त्यानंतर सासरहून तिची माहेरी पाठवणी करण्यात आली. सगळे आनंदात होते मात्र नवरीच्या मनात काही तरी भलतच सुरू होती.

माहेरी आल्यानंतर रात्री शौचाला बाहेर जाण्याच्या बहाण्याने भावजईचा फोन घेतला आणि शेजारच्या गावात राहणाऱ्या प्रियकराला फोन केला, त्यानंतर घरी येऊन झोपली.

लग्नाच्या गडबडीमुळे थकलेले सगळे नातेवाईक गाढ झोपलेले असताना हीच संधी साधत नवरीने घरातून धूम ठोकत पोबरा केला आसुण दोन्ही कुटूंबातील सदस्यांसह नातेवाईक आप्तेष्ठ आणि हितचिंतकांमध्ये नैराश्याची भावना निर्माण झाली आहे

 

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!