क्राईमबीड

परळी ब्रेकींग-छोट्या भाईंवर मोठी कारवाई,! एका व्हिडिओ मुळे खेळ खल्लास

Major action taken against small figures of the emerging dangerous gang in Parli!

वेगवान मराठी परळी प्रतिनिधी दि 22 मे. 2025_बीड परळी येथील बहुचर्चित शिवराज दिवटे -रा.लिंबुटा याच्या मारहाण प्रकरणा नंतर जे 8/9 महिण्यां पुर्वीचे 3 व्हिडीओ व्हायरल झाले होते त्या प्रकरणात नव्याने गुन्हे दाखल..

परळी—नंदागौळ येथील घरासमोर दुचाकीचा हॉर्न का वाजवितो,असे विचारल्याच्या कारणा वरून नंदागौळ येथील शेतकरी कुटुंबातील तरुणास परळीच्या अंडरवर्ल्ड विश्वात नव्याने जम बसवु पाहणाऱ्या नवनिर्मान गैंगच्या ज्युनीयर आकानीं अपहरण करून त्याला जबरदस्ती ने नंदागौळ येथील विठ्ठल टेकडी परीसरात घेऊण गेले होते

त्यानंतर बेल्टने मारहाण केली. तोंडवर, नाकावर बुक्यांनी मारहाण केली.हा प्रकार जुलै २०२४ मध्ये घडला होता. या मारहाणीचा व्हिडीओ बनवून व्हायरल केला होता.

आता 9 महिन्यानंतर परळी येथील ग्रामीण पोलीस ठाण्यात 3 गुंडां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आसुण.सचिन मुंडे, आदित्य गित्ते, सुमित उर्फ बबलू बालाजी गित्ते अशी आरोपींची नावे आहेत.

या पैकी दोघेजन अनुक्रमाने सचिन मुंडे, व आदित्य गित्ते,या आरोपीनीं लिंबुटा येथील मराठा समाजातील शिवराज दिवटे याला अमानुष मारहाण केली होती

त्या आरोपीच्या अटकेनंतर हा जुना व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाला होता आता याही प्रकरणात गुन्हा दाखल झाल्याने या परळीतील उद्योन्मुख ज्युनियर टोळीचे पाय आणखी खोलात गेल्याच दिसत आहे.

बीड जिल्यातल्या परळी तालुक्यातील नंदागौळ येथील पिडीत युवक योगीराज अशोक गित्ते (वय ३२) या शेतकऱ्याने नऊ महिन्यानंतर परळी ग्रामिण पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

आदित्य व सचिन हे अनेकदा घरासमोरुन दुचाकीवरून ये-जा करताना हॉर्न वाजवायचे. एकेदिवशी त्यांची गाडी थांबवुन तुम्ही असे का करता,

असे म्हणाल्यावर ‘तुझ्या बापाचा रस्ता आहे काय, आम्ही काही पण करु. तू आमच्या नादी लागू नको नाही तर तुझ्याकडे बघावे लागेल’ असे म्हणून ते निघून गेले.

२५ जूलै २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता योगिराज हे घरी जाताना नंदागौळ ते घाटनांदुर जाणारे रस्त्यावरील पाण्याचे टाकीजवळ आल्यावर आदीत्य गित्ते व सचिन विष्णु मुंडे हे दुचाकीवरून आले.

योगिराज यांना अडवून त्यांची कॉलर पकडत दुचाकीवर बसवून विठ्ठल टेकडी येथे नेले. तेथे सुमीत हा होता.

तेव्हा सचिन मुंडे व आदित्य गित्ते यांनी ‘तू लई माजलास का आम्हाला रस्त्यात थांबऊन दुचाकीवर रेस का करतो म्हणून विचारतो का’

असे बोलुन दोघांनी शिवीगाळ करुन सचिन मुंडेने बेल्टने तोंडावर, पाठीवर, पायावर आणि हातावर मारहाण करून जखमी केले.

पुन्हा जर आमच्या नादी लागला तर तुला जिवंत सोडणार नाही असे म्हणून योगीराज गित्ते याला जख्मी अवस्थेत नंदागौळ शिवरातील विठ्ठल टेकडी येथील घटनास्थळीच सोडून आरोपी आदित्य गिते आणि सचिन मुंडे निघून गेले.

जर आपण तक्रार दिली तर हि टोळी परत लैई. मारील,या भिती ने तक्रार दाखल करायला खुप वेळ झाल्याचे कारण नंदागौळ येथील पिडीत युवक योगिराज गिते यांनी पोलीसांना दिलेल्या जवाबात सांगीतले आसल्याची प्राथमीक माहिती समोर येत आहे

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!