गुप्तचर विभागा कडुण अलर्ट मोड ! बीड जिल्ह्यात हवाई यंत्र उडविण्यास बंदी !
बीड जिल्ह्यासाठी गुप्तचर विभागा कडुण अलर्ट जारी

!! बीड जिल्हा हद्दीत 3 जूनपर्यंत ड्रोन कॅमेरा,मानव विरहीत यंत्र उडविण्यास मनाई आदेश जारी !!
!! तर लवकरच बीड,छ.संभाजीनगर,व परभणी,मध्ये ROW चे अधिकारी आढावा घेणार आहेत !!
बीड, दि. 22 (वेगवान मराठी प्रतिनिधी केशव डी मुंडे .):- भारतीय सैन्याकडून पहलगाव येथील दहशतवादी हल्ल्याचे नंतर ऑपरेशन सिंदुर राबवुन पाकिस्तान मधील दहशतवाद्यांची ठिकाणे नष्ट करण्यात आलेली आहेत.यामुळे स्लीपर सेल सक्रिय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांचे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ड्रोन कॅमेरा, मानवविरहित यंत्र चालविण्यास, उडविण्यास मनाई करणे बाबत दिनांक 14 मे ते ३ जून 2025 पर्यंत भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलम 163 लागू करणे बाबत राज्य गुप्तवार्ता विभाग मुंबई यांनी कळविले आहे.
सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता नागरिकांचे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून संपूर्ण बीड जिल्ह्यात दिनांक 14 मे 2025 पासून ते 3 जून 2025 पर्यंत तातडीचे परिस्थितीत, नमूद कालावधी करिता भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलम 163 (1)(3) अन्वये आदेश लागू करणेस विनंती करण्यात आली आहे.
तरी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 (2) मधील शक्तीचा वापर करून नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून बीड जिल्हा हद्दीत दि. 16 मे 2025 ते 3 जून 2025 या कालावधीत
ड्रोन कॅमेरा, मानवरहीत यंत्र चालविण्यास किंवा उडविण्यास मनाई आदेश एकतर्फी पारीत करण्यात येत आहे, असे बीडचे अपर जिल्हादंडाधिकारी यांनी नमुद केले आहे.

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.







