क्राईमबीड

परळी अपडेट-मंत्री पंकजा मुंडे यांचा अक्षेपार्ह व्हिडीओ बणवणे तरुणास महागात पडले

Case registered against accused for allegedly spreading Minister Pankaja Munde's video

!! नामदार पंकजा मुंडे यांचा अक्षेपार्ह व्हिडीओ बणवुण सोशल मिडीयावर व्हायरल केल्या प्रकरणी सिरसाळा पोलीस स्टेशन येथे माथेफिरू युवकावर गुन्हा दाखल !!

दिनांक 23 मे 2025 सिरसाळा पोलीस स्टेशन ता. परळी ( वेगवान मराठी प्रतिनिधी केशव डी मुंडे ) याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त थोडक्यात परंतु  अधिकृत माहितीनुसार, सिरसाळा येथील आरोपी नामे :- मतिन मणीयार  याने राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या भाषणाची व्हिडीओ क्लिप एडीट करुण त्यामध्ये चारही बाजुनी अश्लील फोटो लावून तो व्हिडीओ खालील ग्रुपवर सेंड केला

‘ग्रामपंचायत सिरसाळा’ या WHATSAPP ग्रुप वर व्हायरल केलेला तो व्हिडीओ पाहुण सिरसाळा येथील जागरुक सुज्ञ युवकाने.या प्रकरणी नामे :- नशीब रहीम शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सिरसाळा पोलीस स्टेशन, ता परळी वैजनाथ येथे खालील गुन्हे दाखल करण्यात आली आहेत …

गुन्हे रजिस्टार नंबर.138/2025 कलम- 67 (A) माहीती तंत्रज्ञान अधिनीयम सह कलम 296 भारतीय न्याय संहिता 2023 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोनि उस्मान शेख पो. स्टे. सायबर बीड हे करीत आहेत.

दरम्यान या घटणेचा सर्व स्तरातुण संताप व्यक्त करण्यात येत आहे

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!