क्राईमबीड

अनैतीक संबंधातुन एकाचा खून सात जन ताब्यात

Seven arrested for murder of a youth due to immoral love affair

केज येथील आणखी एक थरारक घटणा आली समोर  :- केज तालुक्यातील युसुफ वडगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत अनैतिक संबंधाच्या संशया वरून एका युवकाची मोटार सायकल अडवली

शेतातील झाडाला बांधून केलेल्या मारहाणीत युवकाचा मृत्यू झाला आहे

तर एक जन जखमी झाला आसुन.या प्रकरणी युसुफ वडगांव पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतले आहे तर एक जण अद्याप ही फरार आहे.

( वेगवान मराठी बीड दि 27 मे 2025 )-या बाबतची माहिती अशी की,केज येथील ज्ञानेश्वर दत्तात्रय धपाटे वय २७ वर्ष रा.भाटुंबा ता. केज व त्याचा मित्र सचिन करपे या दोघांना दि. २६ मे रोजी दुपारी ४:३० वा. च्या सुमारास सावळेश्वर ता.केज येथील रोहन मरके, सोन्या मस्के तसेच लाडेगाव येथील चार ते पाच जणांनी अडवून त्या दोघांना रोहन मस्के यांच्या मामाच्या शेतात घेऊन गेले.

आणि झाडाला बांधून त्या सर्वांनी लाकडी काठी आणि बेल्टने अमानुष मारहाण केली आणि  नंतर त्याला जखमी अवस्थेत पावन धाम जवळ असलेल्या रस्त्यावर टाकून दिले.

याची माहिती मारहाण करणाऱ्या आरोपीनीं मयत ज्ञानेश्वर दत्तात्रय धपाटे याच्या मोबाईल फोन वरून त्याचा भाऊ सिद्धेश्वर धपाटे यास दिली.

पुढे सिद्धेश्वर धपाटे आणि गावातील लोकांनी ज्ञानेश्वर दत्तात्रय धपाटे आणि त्याचा मित्र सचिन करपे याला अंबाजोगाई येथे दाखल केले.

दरम्यान काही वेळाने दगडू उर्फ अण्णा उर्फ ज्ञानेश्वर दत्तात्रय धपाटे हा मयत झाल्याचे घोषित केले.

या प्रकरणी सिद्धेश्वर धपाटे याच्या तक्रारी वरून युसुफवडगाव पोलिस ठाण्यात गु. र. नं. १४०/२०२५ भा. न्या. सं. १०३(१), १४०(२), ११५(३), ११८(१), १८९(२), १९०, १९१(२), १९१(३) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे हे करीत आहेत.

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!