
दिनांक 30.05.2025 केज हद्दीत दरोडा टाकुन दहशत निर्माण करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या टोळीवर मोक्का कायदयाअंतर्गत कारवाई (बीड जिल्ह्यातील पाचव्या गुन्हेगारांच्या टोळीला मोक्का)
(वेगवान मराठी प्रतिनिधी केशव डी मुंडे) बीड जिल्हयातील कायदा आणि सुव्यवस्था अवादित राखण्यासाठी बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. नवनीत कॉवत यांनी शर्थीचे प्रयत्न चालवले आहेत. बीड जिल्हयातील गुन्हेगारीचे व गुंडगिरीचे समूळ उच्चाटन करण्याचा उदात्त दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून MCOCA व MPDA व कलम 55,56,57 मपोका अन्वये बऱ्याच गुन्हेगारांवर व गुंडावर कार्यवाही करण्याचा धड़ाका बोड जिल्हाचे पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली बीड पोलीसांनी सुरु ठेवला आहे.
जनतेच्या जिविताचे व मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी जिल्हयात चोऱ्या, दरोडे, घरफोडया, खून, खुनाचा प्रयत्न, दरोडयाची तयारी, बलात्कार, जुलुमाने घेणे, पळवून नेणे, खंडणी मागणे या व अशा गंभीर स्वरुपाचे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांविरुध्द ठोस कारवाई करण्यासाठी बीड जिल्हयातील पोलीस जिल्हयातील व जिल्हाचे बाहेरील गुन्हेगारावर करडी नजर ठेऊन आहेत.
फिर्यादी नामे आकाश भास्कर जाधव वय 26 वर्षे व्यवसाय खाजगी नौकरी, वॉचमन अवादा कंपणी मस्साजोग रा. विडा ता. केज जि. बीड यांनी फिर्याद दिली की, दिनांक 07/04/2025 रोजी रोजी सायंकाळी 07.00 वाजता मी सोबत अभिजीत दुनधव असे मौजे विडा शिवारात आवादा कंपनीने कामावर वॉचमन म्हणून काम करत असतांना रात्री, अंदाजे 11.45 वाजेच्या सुमारास तेथे अनोळखी 14 लोक चालत आले त्यावेळेस मी व अभिजीत दुनधव यांनी त्या अनोळखी लोकांना तुमचे इकडे काय काम आहे ? असे म्हणताच
त्यातील चार लोक आमचे जवळ आले, त्यांच्या हातातील लाकडी दांडवाने आम्हांला मारहाण करुन जखमी केले. त्यातील चारपैकी दोघे सडपातळ होते व दोघे जाड होते. त्यांनी बाजूला पडलेल्या सतरंजीच्या पट्टीने त्यातील दोन लोकांनी माझे व इतर दोन लोकांनी अभिनीत दुनधव यांचे हात पाय बांधले व इतर 10 लोक हे आवादा कंपनीचे चालु असलेल्या पवनचक्कीच्या पाईप मधुन लोखंडी शिडीवर चढले व जवरदस्तीने खालील वर्णनाचा माल 1) रोटर केवल 2,00,000/-रु 2) स्टार्टन केवल 8,11,000/ रु 3) अधीग केवल 2,76,000/- असे एकूण 12,87,000/- रु. चा माल चोरुन नेला आहे.
तरी दिनांक 07/04/2025 रोजीचे रात्री 11.45 ते दिनांक 08.04.2025 चे 04.00 वा.सु. बातील अनोळखी 14 चोरटयांनी मौजे विडा शिवारातील WTG 48 लोकेशन मधील पवनचक्कीचे काम सुरु असलेल्या ठिकाणी येवुन, मला व अभिजीत दुनधव याला लाकडी दंडुक्याचा धाक दाखवून आमचे हात-पाय बांधुन लाकडीकाठीने माराहण करुन जखमी करुन वरील वर्णनाचा अंदाजे 12,87,000/-रुपयाचा चोरुन नेला म्हणून माझी त्यांचे विरुध्द तक्रार आहे.
वगैरे मजकुरा वरून पो.स्टे. केज गु.र.नं. 145/2025 कलम 310(2) भारतीय न्याय संहिता प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचे तपासात केज/स्थागुशा पोलीसांनी आरोपींचा बारकाईने शोध घेवुन
सदर गुन्ह्यातील आरोपी नामे 1. बबन सरदार शिंदे वय 40 वर्षे रा. नांदुरपाट ता. केज जि. बीड 2. धनाजी रावजी काळे वय 23 वर्षे रा. लक्ष्मी पारधी वस्ती तेरखेडा ता. वाशी जि. धाराशिव 3. मोहन हरी काळे वय 30 वर्षे रा. सदर 4. लालासाहेब सखाराम पवार वय 26 वर्षे रा. दसमेगांव ता. वाशी जि. धाराशिव यांना दिनांक 14/04/2025 रोजी अटक केली व त्यांची PCR घेऊन तपास केला आहे.
तसेच गुन्हयांत इतर 06 आरोपी निष्पन्न झाले असुन ते फरार आहेत पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. तपासा दरम्यान अटकेतील आरोपीतांकडून गुन्हयातील चोरलेला माल
कॉपर वायर व बोलेरो गाडी असा एकुण 9,00,000/- लक्ष रु चा माल जप्त केला आहे. सदर टोळी ने आज पावेतो संघटीतरीत्या बीड व धाराशिव जिल्हयातील पो. स्टे. केज, नेकनुर, डोकी, वाशी हद्दीत एकुण ।। गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. ज्यात दरोडा टाकणे, जबरी चोरी करणे, घरफोडी करणे, गंभीर दुखापत करणे या सारखे गंभीरस्वरुपाचे गुन्हे केले आहेत.
प्रस्तावात एकुण ।। गुन्हे विचारात घेण्यात आले. त्यापैकी 19 गुन्हयांची दखल न्यायालयाने घेतलेली असून 02 गुन्हा पोलीस तपासावर आहे. सर्व गुन्हे 10 वर्षाच्या आतील असून 03 वर्षापेक्षा जास्त शिक्षेस पात्र आहेत. सदर टोळीचा टोळी प्रमुख याने स्वतःच्या व टोळीतील इतर सदस्यांच्या आचौक फायदयासाठी सदरचे गुन्हे केल्याचे पोलीस अधीक्षकांच्या चानाक्ष नजरेतुन लपुन राहीले नाही.
त्यावरुन बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या सुचने वरुन सदर प्रकरणांत तपासी अधिकारी पोनि वैभव पाटील पो.स्टे. केज यांनी अपर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई व स.पोलीस अधिक्षक केज यांचे मार्गदर्शनाखाली सदर टोळी विरुध्द मोक्का कायद्या अंतर्गत प्रस्ताव तयार करुन दिनांक 13/05/2025 रोजी पोलीस अधीक्षकांना सादर केला होता.
पोलीस अधिक्षक, श्री नवनीत काँवत यांनी सदर प्रस्तावाचे अवलोकन करुन दिनांक 20/05/2025 रोजी प्रस्ताव आपले शिफारशी सह मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र छत्रपती संभाजीनगर यांना सादर केला होता.
मा. श्री. विरेंद्र मिश्र विशेष पोलीस महानिरीक्षक, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र छत्रपती संभाजीनगर यांनी सदर प्रस्तावाचे अवलोकन करुन दिनांक 29/05/2025 रोजी नमूद संदभीय गुन्हयांत महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 मधील कलमांचा अंतर्भाव करण्याची परवानगी दिल्याने पोलीस अधीक्षक बीड यांनी सदर प्रकरणांचा पुढील तपास श्री. कमलेश मीणा, सहायक पोलीस अधीक्षक केज यांचेकडे दिला आहे
मोक्का कायदयाचे कलम 3(1) (8) 3(2),3(4) समाविष्ठ करणे बाबत आदेशीत केले आहे. त्यावरुन सहायक पोलीस अधीक्षक केज हे सदर गुन्हयांचा पुढील तपास करीत आहेत. सदर प्रकरणांत 04 आरोपी अटक असुन 06 आरोपी फरार आहेत. पोलीस त्यांच्या शोधात आहेत.
सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक श्री. नवनीत कौवत, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके, सहायक पोलीस अधीक्षक केज श्री. कमलेश मीणा, पोलीस निरीक्षक श्री उस्मान शेख, स्वागुशा बीड, यांचे मार्गदर्शनाखाली पोनि श्री वैभव पाटील, पोउपनि उमेश निकम, पोअं/संतोष गित्ते, शिवाजी कागदे, सर्व पो. स्टे. केज तसेच सपोउपनि अभिमन्यू औताडे, निलेश ठाकुर, विभीषण चव्हाण स्थागुशा बीड यांनी केली आहे.
भविष्यातही शरीराविरुध्दचे व मालाविरुध्दचे गंभीर गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगार व गुन्हेगारांच्या टोळयावर व कायद्याला न जुमानणाऱ्या व्यक्ती विरुध्द तसेच बीड जिल्ह्यात धुमाकुळ घालणाऱ्या गुन्हेगारांवर मोक्का व एम.पी.डी.ए. कायदया अंतर्गत कठोर कारवाई करण्याचे संकेत पोलीस अधीक्षक श्री नवनित कोंवत यांनी दिले आहेत.

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.








