क्राईमबीड

मातोश्री महिला पतसंस्थेचा MPID प्रस्ताव मंजुर

MPID proposal of Matoshree Mahila Patsanshte approved

मातोश्री महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या, वीड ता.जि.बीड या पतसंस्थे विरुध्द दाखल गुन्हयातील आरोपीतांच्या स्थावर मालमत्तेच्या एमपीआयडी प्रस्तावास गृह विभाग, मंत्रालयातुन मंजुरी आली आहे.

वेगवान मराठी प्रतिनिधी केशव डी मुंडे बीड दि-६ जुन 2025 मातोश्री महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या.  ता.जि.बीड था पतसंस्थेची मुख्य शाखा ही सिध्दीविनायक कॉम्प्लेक्स, व्यापार संकुल बीड, गाळा क्र.डी-15 मध्ये होती.

सदर पतसंस्थेच्या अपहारातील मुख्य आरोपी व्यवस्थापक, लिपीक/कॅशियर, अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळ यांनी मिळून दिनांक 03/12/2018 ते 06/06/2022 पावेतो ठेवीदारांना जास्त व्याजदराचे आमीष दाखवून 3221 ठेवीदारांच्या ठेवी ठेवुन घेवुन त्यांच्या मुदती संपल्यानंतरही त्यांना परत केलेल्या नव्हत्या.

त्या ठेवीदारांपैकी एक ठेवीदार असलेले श्री. विद्याधर विश्वनाथ वैद्य वय 52 वर्षे, व्यवसाय खाजगी नौकरी रा.क्यु बिल्डींग फ्लॅट नं.02 अमृतसाई प्लाझा रेल्वेस्टेशन रोड औरंगाबाद यांचे तक्रारीवरुन

त्यांनी ठेवलेल्या एकूण रक्कम 12,92,640/- रु. त्यांना परत न करता त्यांची फसवणुक केले बाबतचा गुन्हा पो.स्टे. बोड शहर येथे गुन्हा रजि. क्रमांक 156/2022 क. 420, 406, 34, 120 (ब) भादवीसह क. 34 महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंधाचे रक्षण करण्याबाबत अधिनियम 1999, प्रमाणे दाखल करण्यात आलेला होता.

सदरचा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखा, बीड येथे वर्ग झाल्यानंतर गुन्हयातील मुख्य शाखेचा घटनास्थळ पंचनामा करण्यात आला.

त्यावेळी सर्व शाखेचे बारकाईने निरीक्षण करुन तसा सविस्तर शासकीय पंचासमक्ष पंचनामा करण्यात आला. गुन्हयातील मुख्य आरोपीस अटक करुन त्यांच्याकडे अपहारीत रक्कमेबाबतव गुन्हयाबाबत विचारपुस करण्यात आली,

त्यानंतर सदर पतसंस्थेचे उप निबंधक सहकारी संस्था, कार्यालय बीड येथील प्रशासकीय मंडळ मातोश्री महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या, बीड यांचेकडुन लेखा परीक्षण करुन घेवून अहवाल प्राप्त करुन घेतला. सदर अहवालाप्रमाणे आरोपीतांनी एकूण 2,35,39,640.32/- रु.चा अपहार केल्याचे निष्पन्न झाले.

ठेवीदारांच्या ठेवीची रक्कम ही ठेवीदारांना मिळणे आवश्यक असल्याने आरोपीतांच्या स्थावर व जंगम मालमत्तेचा शोध घेण्यात आला व त्या स्थावर मालमत्तेच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारावर बंदी घालण्यात आली.

सदर आरोपीच्या प्राप्त मालमत्तेचे शासकीय भावाप्रमाणे मुल्यांकन काढुन घेवून एकुण 45,85,366.6 रु.चा महाराष्ट्र ठेवीदार वित्तीय संस्थेतील हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम 1999 (MPID ACT) प्रस्ताव

अपर पोलीस महासंचालक, म.रा. मुंबई यांचे कार्यालयात पाठवण्यात आलेला होता व तेथुन पुढे तो गृह विभाग, मंत्रालयात पाठवण्यात आलेला होता.

गृह विभाग, मंत्रालयातुन सदर प्रस्तावास मंजुरी दिले बाबतचे आज रोजी आदेश प्राप्त झाल्याने ठेवोदार यांना त्यांनी ठेव स्वरुपात ठेवलेली रक्कम परत मिळणे सुकर झाले आहे.

सदरची कामगिरी मा. विरेंद्र मिश्र, विशेष पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजी नगर, परिक्षेत्र छत्रपती संभाजी नगर, मा. नवनीत कॉवत, पोलीस अधीक्षक वीड, मा. सचिन पांडकर, अपर पोलीस अधीक्षक बीड,

मा. पोलीस निरीक्षक संतोष शेजाळ, प्रभारी अधिकारी आर्थिक गुन्हे शाखा, बीड यांचे मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखा येथील पोलीस उप निरीक्षक भारत बड़े. सहा. पोलीस उप निरीक्षक श्रीकृष्ण हुरकुडे यांनी व इतर अंमलदार यांनी केलेली आहे.

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!