
बीड पोलीसांची कौतुकास्पद कार्य ! 17 गोवंशाची कतलखाण्यातुन केली सुटका
———-
वेगवान मराठी प्रतिनिधी केशव डी मुंडे बीड दिनांक 7/6/25 रोजी पोलिस स्टेशन पेठ बीड पोलिस निरीक्षक अशोक मुदिराज, Api प्रीतमकुमार पुजारी ,HC/नितीश माने, चालक इम्रान सय्यद यांना मिळालेल्या गोपनीय माहिती वरून 17 गोवंशीय प्राण्यांना कत्तल करणे चे उद्देशाने मोहम्मदिया कॉलनी जवळ प्लॉट वर दोरीने बाधून ठेवलेले गोवंश मिळून आले. त्या ठिकाणी छापा टाकून सर्व गोवंश ताब्यात घेतले.
आरोपी गणी बबलू कुरेशी कुरेशी मोहल्ला व इतर दोन अनोळखी घटना ठिकाणावरून पळून गेले. एकूण 17 गोवंश किंमत 250000/- दोन लाख पन्नास हजार रुपये चे ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही करीत आहेत
सदर कार्यवाही मा.पोलिस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर ,उपविभागीय पोलिस अधिकारी श्री मीना साहेब यांचे मार्गदर्शन खाली.करण्यात आली आहे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.








