
अनु. जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा परळी
6 वी ते 10 वी वर्ग (सेमी माध्यम) च्या रिक्त जागेसाठी पात्र विद्यार्थ्यांचा प्रवेश घेण्याचे आयुक्तांचे आवाहन
बीड दि. 14 मे 2025 (केशव डी मुंडे वेगवान मराठी प्रतिनिधी- ) : – महाराष्ट्र शासन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत अनु. जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा, परळी वै. जि.बीड, शासकीय आय. टी.आय. कॉलेज जवळ अंबाजोगाई रोड परळी (वै.) येथे शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी इ.6 वी ते 10 वी (सेमी माध्यम) च्या रिक्त जागेसाठी पात्र विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देणे सुरु आहे.
प्रवेशासाठी आरक्षण:- अनुसूचित जाती-80 टक्के अनुसूचित जमाती-10 टक्के विमुक्त जाती व भटक्या जमाती -05 टक्के, दिव्यांग 03 टक्के विशेष मागास प्रवर्ग 2 टक्के
शाळेची वैशिष्टये-
सेमी माध्यमाचे गुणवत्ता पुर्ण शिक्षण, नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर विद्यार्थ्याना मोफत गुणवत्तापुर्ण शिक्षणाची / निवासाची व जेवणाची उत्तम सोय, स्पर्धा परीक्षेतुन आलेले तज्ज्ञ व अनुभवी प्रशिक्षीत शिक्षक,
निसर्गरम्य वातावरणात व सर्व सोयींनी युक्त सुसज्ज भव्य इमारत, विद्यार्थ्याना गणवेश व सर्व शैक्षणिक व इतर साहित्य मोफत
ई- लर्निग/डिजीटल क्लासरुम, स्मार्ट टी.व्ही. अध्ययन-अध्यापन सुविधा, सुसज्ज ग्रंथालय, वाचन कक्ष आणि प्रयोगशाळा, अद्यावत संगणक कक्ष,
100 टक्के निकालांची पंरपरा, गुणवत्ता संवर्धनासाठी रात्र अभ्यासीकेची स्वतंत्र व्यवस्था व वैयक्तीक मार्गदर्शन.
प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे
शाळा सोडल्याचा दाखला,
विद्यार्थ्याचे जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र,
विद्यार्थ्याचे आधार कार्ड,
पालकाचे उत्पन्न प्रमाणपत्र,
मागील इयत्तेचे गुणपत्रक
विद्यार्थी संचयिका पुस्तीका,
पासपोर्ट साईज फोटो (6 प्रती),
पालकाचे ओळखपत्र (मतदान कार्ड / आधार कार्ड/पॅन कार्ड),
विद्यार्थ्याचा वैद्यकीय तपासणी अहवाल.
प्रवेशासाठी संपर्क:- सोनवणे बी.एम. मुख्याध्यापक- 9922329028, सहा. शिक्षक- वैराळ एस. जे.-
9860571487, कराड व्ही. एन.-9970814261, शेळके आर. व्ही.-9403789161, यावर संपर्क साधण्याचे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त यांनी केले आहे.

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.








