
वैजनाथ सहकारी कारखाना पांगरी परळी व शेपवाडी येथील पॉवरग्रीड मधील साहीत्य चोरणारी टोळी गजाआड स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी
वेगवान मराठी प्रतिनिधी केशव डी मुंडे दि 10 जुन 2025 -पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी कारखाण्यातील साहित्याची काही वर्षापुर्वी परळी येथील चोरट्यांनी चोरी केली होती त्यावेळी या संदर्भात उलट सुलट चर्चा होत होती
मा. पोलीस अधीक्षक बोड यांनी बीड जिल्हयामध्ये चोरीच्या घटना होत असल्याने चोरी करणाऱ्या टोळीला पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेला सुचना दिल्या होत्या.
त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेने पोलीस ठाणे अंबाजोगाई शहर दाखल गुन्हयातील मौजे शेपवाडी येवील पॉवरग्रीड येथील 12,95,000/- किमतीचे अॅल्युमिनीयमचे साहीत्य चोरीस गेलेले होते व परळी वैजनाथ येथील साखर कारखाण्यामधील 60,000/-किमतीचे पितळी साहित्य चोरी गेले होते.
या गुन्हयांचा तांत्रिक विश्लेषन व समांतर तपास करीत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, आरोपी नामे 1) शेख जावेद शेख हबीब व त्याचे साथीदार तसेच 2) बंडु लक्ष्मण जोगदंड व त्याचे साथीदार या दोन्ही टोळयांनी चोरले आहे.
त्या टोळी मधील आरोपी परळी येथे आहेत त्यावरुन लागलीच पोलीस निरीक्षक श्री शिवाजी बंटेवाड, स्थानिक गुन्हे शाखा बीड यांनी पोलीस उपनिरीक्षक श्री सुशांत सुतळे यांची टिम आरोपी शोध कामी परळी येथे रवाना केली. तेथे जावुन टिमने आरोपीचा शोध घेतला असता
मोठ्या शिताफीने यातील आरोपी 1. शेख जावेद हबीब, वय 39 वर्ष, रा. बरकर नगर परळी वै. जि.बीड 2. बंडु लक्ष्मण जोगदंड, वय 50 वर्ष, रा. रुमना जवळा ता. गंगाखेड, जि. परभणी ह. मु शिवाजीनगर परळी वै. 3. विजय नारायण जोगदंड, वय 42 वर्ष, रा. भिमनगर परळी वे जि. बीड
4. शेख अब्दुल रौफ ईस्माईल, वय 45 वर्ष, रा. जुना रेल्वे स्टेशन परळी वे जि. बीड 5. प्रेम रावसाहेब वाघमारे, वय 19 वर्ष, रा. नागसेननगर परळी वै जि.बीड 6. संतोष सोपान कांबळे, वय 30 वर्ष, रा मिलींदनगर परळी वे जि. बीड.
यांना ताब्यात घेवुन पुढील तपासकामी पोलीस ठाणे अंबाजोगाई शहर यांचे ताब्यात देण्यात आले असुन त्याचे कडुन पोलीस ठाणे अंबाजोगाई शहर व परळी ग्रामीण असे चोरीचे दोन गुन्हे उघड करण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
यातील चोरीस गेलेले अॅल्युमिनीयम साहीत्य कोणास विकले, कोणाकडे आहे याचा संयुक्तरित्या शोध पोलीस ठाणे अंबाजोगाई शहर व स्थानिक गुन्हे शाखा बीड हे घेत आहेत.
सदरील कारवाई ही श्री नवनित काँवत, पोलीस अधीक्षक बीड, श्रीमती चेतना तिडके, अपर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, सुशांत सुतळे,
पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार मारोती कांबळे, विकास राठोड, विष्णु सानप, नितीन वडमारे व सचिन आंधळे, विकी सुरवसे सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा बोड यांनी केली आहे.
पॉवरग्रीड व कारखाण्यामधील सामान चोरणारी टोळी पकडल्याने चोरीवर आळा बसणार आहे.

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.








