
48 तासात लावला गुन्ह्याचा छडा, चोरीस गेलेले 10,50,000/ रुपये चे सोने मिळवले परत.
बीड शहर पोलिसांची कामगिरी.
वेगवान मराठी प्रतिनिधी केशव डी मुंडे – बीड दिनांक 08/06/2025 रोजी, डॉक्टर लक्ष्मीकांत आंधळे यांच्या घरातून ते बाहेर गेले असताना घरात प्रवेश करून कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांच्या कपाटात ठेवलेले सोन्याचे चैन, गंठण, आणि अंगठी असे 11 तोळे सोने चोरट्याने चोरी करून नेले होते..
दिवसा चोरी झाल्याने पोलिसांपुढे गुन्हा उघडकीस आणण्याचे मोठे आव्हान होते.
सीसीटीव्हीच्या मदतीने त्या भागामध्ये कोणाचा वावर होता याचा बारकाईने अभ्यास केला गेला. त्यावरून एका महिलेला अटक करण्यात आली.
तिच्याकडे सखोल विचारपुस करुन तिच्या कबूलीअंती गुन्ह्यात चोरी गेलेला संपूर्ण ऐवज आरोपी महीलेकडून जप्त करण्यात आला आहे.
आरोपीचे नाव लक्ष्मी प्रमोद वडमारे राहणार पंचशील नगर बीड असे आहे.
दोनच दिवसात पोलिसांनी चोरीस गेलेल्या मुद्देमाल परत मिळवल्यामुळे फिर्यादीने समाधान व्यक्त केले आहे…
पोलीस अधीक्षक श्री नवनीत काँवत आणि अपर पोलिस अधीक्षक श्री सचिन पांडकर यांनी घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सर्व पोलीस ठाणे प्रभारी यांना सूचना दिलेल्या आहेत.
त्यांच्या मार्गदर्शनानुसार बीड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री शितल कुमार बल्लाळ
सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री बाबा राठोड पोलीस अंमलदार संजय राठोड, मनोज परजणे, गहिनीनाथ बावनकर राम पवार यांनी अथक परिश्रम करून नमूद गुन्हा उघडकीस आणला आहे.

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.








