क्राईमबीड

परळी तालुक्यातील दादाहारी वडगांव येथील गुटखा माफियांवर पोलीसांची रेड

Sambhajinagar Parli police take action against gutkha mafia in Dadahari Vadgaon

!! दादाहारी वडगांव येथील उद्धव पंढरीनाथ गोलेर व एका अल्पवयीन गुटखा माफियांवर परळी येथील संभाजीनगर पोलीसांची मोठी कारवाई !!

केशव डी मुंडे वेगवान मराठी परळी प्रतिनिधी दि. 26/06/205: स्कुटीवर मिळाले 4 गुटख्याचे पुढे त्यावरून शोधला 3,70,000/- चा गुटखा, दोघे संभाजीनगर पो.स्टे. परळी पोलीसांच्या ताव्यात…

दिनांक 23/06/2025 रोजी संभाजीनगर पो.स्टे. परळी येथील पोलीस उपनिरीक्षक श्री.ए.टी. शिंदे हे स्टाफसह पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना त्यांना संभाजी चौक इटके कॉर्नर येथे एक अल्पवयीन स्कुटीचालक स्कुटीवर पिशवी लटकवून संशयीतरीत्या येतांना दिसला. त्यावेळी पोलीस पथकाने त्यास थांबवून त्याचे नाव गांव विचारुन त्याच्याकडील पिशवीची झडती घेतली असता त्यामध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला गुटख्याचे चार पुडे मिळुन आले. त्यावेळी पोलीस पथकाने सदरचा गुटखा कोठुन आणला याबाबत विचारणा केली असता त्याने सदरचा गुटखा दादाहरी वडगांव येथील उद्धव गोलेर यांचे किराणा दुकानातून आणला असल्याचे सांगीतले. त्यावरुन पोउपनि. शिंदे यांनी सदरची बाब वरीष्ठांना कळवून अधीक मनुष्यबळ उपलब्ध करून घेवुन दादाहरी वडगांव येथील उद्धव पंढरीनाथ गोलेर यांचे किराणा दुकानात छापा टाकला असता त्यांचे दुकानात 3.70.378/- रुपये किंमतीचा महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेला गुटखा मिळुन आला. त्याच प्रमाणे 15000/- रुपये किमतीची होंडा अॅक्टीवा स्कुटी क्रमांक एमएच 44 वाय 8424 असा एकुण 3,85,378/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यावरुन अन्न व औषध प्रशासन बीड येथील अनुराधा ज्ञानदेव भोसले अन्न सुरक्षा अधिकारी यांना माहीती देवुन त्यांनी सदर मुद्देमालाचा सविस्तर पंचनामा करुन त्यांचे फिर्यादीवरुन पोलीस स्टेशन संभाजीनगर येथे 1) उद्धव पंढरीनाथ गोलेर रा. दादाहरी वडगांव ता. परळी जि. बीड व एक अल्पवयीन यांचे विरुद्ध गुर.नं. 126/2025 अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम 2006 चे कलम 26(2) (iv), 27(3)(d), 27(3)(e), 30(2) (a), 59 सह कलम 123,233,274,275 भारतीय न्याय संहीता प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कौतुकास्पद कामगिरी मा. पोलीस अधिक्षक श्री. नवनीत काँवत (भा.पो.से.), अपर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. कमलेश मिना, पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ए.टी. शिंदे, पोह/1253 नागरगोजे, पोह/416 पठाण, पोकॉ/710 चव्हाण, पोकॉ/2054 ठोंबरे, पोकॉ/1476 पेरडलवार तसेच अन्न व औषध प्रशासनच्या अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती अनुराधा ज्ञानदेव भोसले यांनी केली आहे.

 

दि. 26/06/205: स्कुटीवर मिळाले 4 गुटख्याचे पुढे त्यावरून शोधला 3,70,000/- चा गुटखा, दोघे संभाजीनगर पो.स्टे. परळी पोलीसांच्या ताव्यात…

दिनांक 23/06/2025 रोजी संभाजीनगर पो.स्टे. परळी येथील पोलीस उपनिरीक्षक श्री.ए.टी. शिंदे हे स्टाफसह पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना त्यांना संभाजी चौक इटके कॉर्नर येथे एक अल्पवयीन स्कुटीचालक स्कुटीवर पिशवी लटकवून संशयीतरीत्या येतांना दिसला.

त्यावेळी पोलीस पथकाने त्यास थांबवून त्याचे नाव गांव विचारुन त्याच्याकडील पिशवीची झडती घेतली असता त्यामध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला गुटख्याचे चार पुडे मिळुन आले.

त्यावेळी पोलीस पथकाने सदरचा गुटखा कोठुन आणला याबाबत विचारणा केली असता त्याने सदरचा गुटखा दादाहरी वडगांव येथील उद्धव गोलेर यांचे किराणा दुकानातून आणला असल्याचे सांगीतले.

त्यावरुन पोउपनि. शिंदे यांनी सदरची बाब वरीष्ठांना कळवून अधीक मनुष्यबळ उपलब्ध करून घेवुन दादाहरी वडगांव येथील उद्धव पंढरीनाथ गोलेर यांचे किराणा दुकानात छापा टाकला असता त्यांचे दुकानात 3.70.378/- रुपये किंमतीचा महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेला गुटखा मिळुन आला.

त्याच प्रमाणे 15000/- रुपये किमतीची होंडा अॅक्टीवा स्कुटी क्रमांक एमएच 44 वाय 8424 असा एकुण 3,85,378/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

त्यावरुन अन्न व औषध प्रशासन बीड येथील अनुराधा ज्ञानदेव भोसले अन्न सुरक्षा अधिकारी यांना माहीती देवुन त्यांनी सदर मुद्देमालाचा सविस्तर पंचनामा करुन त्यांचे फिर्यादीवरुन पोलीस स्टेशन संभाजीनगर येथे

आरोपी 1) उद्धव पंढरीनाथ गोलेर रा. दादाहरी वडगांव ता. परळी जि. बीड व एक अल्पवयीन यांचे विरुद्ध गुर.नं. 126/2025 अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम 2006 चे कलम 26(2) (iv), 27(3)(d), 27(3)(e), 30(2) (a), 59 सह कलम 123,233,274,275 भारतीय न्याय संहीता प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कौतुकास्पद कामगिरी मा. पोलीस अधिक्षक श्री. नवनीत काँवत (भा.पो.से.), अपर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. कमलेश मिना,

पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ए.टी. शिंदे, पोह/1253 नागरगोजे, पोह/416 पठाण, पोकॉ/710 चव्हाण, पोकॉ/2054 ठोंबरे, पोकॉ/1476 पेरडलवार तसेच अन्न व औषध प्रशासनच्या अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती अनुराधा ज्ञानदेव भोसले यांनी केली आहे.

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!