
रोज हजारो गायी बैलांना कत्लेआम केले जात आहे ईद सारख्या सणाला कित्येक बळी दिले जातात तिथे शेपुट आत घालुण बसलेल्या समाज सुधारकांना हिंदुंनी दिलेला कोंबडीचा बळी पण सहन करत नाहीत…

वेगवान मराठी प्रतिनिधी केशव डी मुंडे परळी वैजनाथ दिनांक 5 जुलै 2025 शनीवार – काल दिनांक 4/7/2025 शुक्रवार रोजी परळी शहरात सप्तश्रृंगी देवीच्या मिरवणुकी दरम्यान हिंदु धर्माच्या रिती रिवाजा प्रमाणे विधी करीत कोंबड्याचा किंवा बकरीचा देवीला बळी देण्याची हिंदु धर्मात पुर्वापार परंपरा आहे परंतु ,अंधश्रध्दा प्रतिबंध कायद्याचा आधार घेऊण हिंदु धर्माच्या प्रथा परंपरेचा विरोध करण्याचा हा खोडसाळ पणा दिसत असुण माजी नगराध्यक्ष दिपक नाना देशमुख यांना या आडुण छळण्याचा प्रकार समोर आला आहे.
नेमके काय म्हटले आहे फिर्यादीने तक्रारी मध्ये 👇

याप्रकरणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी परळी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार माजी नगराध्यक्ष व आयोजक दिपक देशमुख (रा. गणेशपार, परळी वै.) यांच्यावर भारतीय न्याय संहिता 2023 (BNS) चे कलम 325 आणि महाराष्ट्र जादूटोणा कायदा 2013 चे कलम 3 (2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, दिनांक 4 जुलै 2025 रोजी, परळी शहरात सप्तश्रृंगी देवीच्या मूर्तीस्थापनेनिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती.
दुपारी 12.30 ते 1 च्या सुमारास, राणी लक्ष्मीबाई टॉवर परिसरात या मिरवणुकीमध्ये रस्त्याच्या मधोमध कोंबडा कापून बळी दिला, तसेच हळद, कुंकू,मतलिंबू व नागवेलीची पाने टाकून अघोरी विधी केला, असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
हा प्रकार समाजात भीती आणि अंधश्रद्धा पसरवणारा असुन, त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे, असे फिर्यादीत नमूद आहे.
ही तक्रार बालाजी रानबा ढगे (वय 41, रा. रामनगर, परळी वै.) यांनी दिली असून ते अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. त्यांच्या सोबत अंनिसचे सुकेशनी नाईकवाडे, विकास वाघमारे, प्रा. दासु वाघमारे आणि रानबा गायकवाड हे देखील उपस्थित होते.
या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी BNS 2023 कलम 325 – धार्मिक आस्थेच्या नावाखाली हिंसक, अमानुष व अघोरी कृती तसेच महाराष्ट्र नरबळी आणि जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम 2013, कलम 3(2) – बळी देणे व इतर अघोरी प्रथांवर बंदी कायद्यांअंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. परळी शहर पोलीस या बाबतचा अधिक तपास करीत आहेत.
या घटनेवर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
“अशा अघोरी प्रकारांमुळे समाजात अंधश्रद्धा वाढते आणि शोषणास खतपाणी मिळते. समाजाने सजग राहून याविरोधात उभं राहणं आवश्यक आहे,”
असे मत अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे.

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.








