क्राईमबीड

परळीतील भुरट्या चोरांची माहिती देणारास मिळणार बक्षीस

Journalist to get a hefty reward for providing information about thieves in Parli Vaijnath

!! परळी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भुरट्या चोरांचा उच्छाद !!.भुरट्या चोरांना परळी शहर पोलीस अभय ?

(-बातमीची चौकट )

पत्रकार बालाजी जगतकर यांच्याकडून भुरटे चोर पकडून देणारास किंवा माहिती पुरवणारस 1000/-रु चे रोख बक्षीस देण्यात येणार आहे.

माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. परळी शहरातील जगतकर गल्ली,आदोडे गल्ली, ताटे गल्ली, रमानगर,प्रबुद्ध नगर, साठे नगर,भीमनगर परळी या भागातील भुरट्या चोरट्यांचे फोटो व्हिडिओ किंवा माहिती पाठवण्या साठी मोबाईल .क्रमांक- 9960 174 597

वेगवान मराठी परळी प्रतिनिधी केशव डी मुंडे  -दि 8 जुलै 2025  बीड जिल्ह्यात पोलीस प्रशासनाचा वचक राहावा म्हणून आय.पी.एस. अधिकारी नवनीत कावंत यांची एस.पी. म्हणून बीड जिल्हा येथे पाठवण्यात आलं, परंतु सुरुवातीला काही दिवस वाटलं होतं, पोलीस प्रशासनाने आपली आलेली मरगळ झटकून कामाला सुरुवात केली आहे.

तसा काही जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांनी आव देखील आणला व थातूरमातूर पोलीस कारवाया दाखवून एस.पी.नवनीत कावत यांचे मनही जिंकले.

पण कार्यपद्धती बघून अनेकांच्या बदल्या देखील करण्यात आल्या परंतु आता परिस्थिती पहिल्यासारखीच जैसे थे आहे.

पोलीस प्रशासनाला सर्वसामान्य जनतेच्या संरक्षणासाठी, अडचणीसाठी, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी काम करावं लागतं, परंतु त्याला हरताळ फासत, पोलीस कर्मचारी व पोलीस अधिकारी काम करत आहेत असंच चित्र सध्या दिसत आहे.

मटका, गुटका, बिंगो, ऑनलाइन लॉटरी,पत्तेचे क्लब,अवैध धंदे, हातभट्टी विक्रेते, यांना खुलेआम विक्री करण्याची परवानगी दिली आहे का ? असे चित्र सध्या परळी शहरात दिसून येत आहे.

या सर्व अवैध धंद्यामुळे व्यसनाधीन झालेल्या तरुण व बिघडलेल्या मुलांकडून भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण दर दिवस कुठेतरी चोरी होत आहे.

या भागातील नागरिकांना याचा फटका बसला आहे व बसत आहे. त्यामध्ये छोटी छोटी दुकाने फोडणे, दुकानात कोणी नसताना दुकानातील गल्ला चोरणे,

घराच्या बाहेर लावलेल्या टू व्हीलर, थ्री व्हीलर फोर व्हीलर या गाड्यांमधून बॅटऱ्या चोरणे, नळाचे पाणी घरामध्ये घेण्यासाठी लावलेल्या विद्युत मोटारी चोरणे,

गॅसचे सिलेंडर, सायकल, मोटरसायकल, पाळीव प्राण्यांमध्ये शेळ्या, लहान मुलांच्या गळ्यातील सोन्याची पान, हातातील उपायातील चांदीचे वाळे,

बोकड,गाई,म्हशी,घराच्या बाहेर ठेवलेले गृह उपयोगी भांडे, स्टील, पितळ, जर्मल, बकेट हांडे, घागरी असे साहित्य चोरी सर्रासपणे दर दिवस होत आहे.

भुरट्या चोऱ्यांचे सत्र सुरू असतानाच शहर पोलिसांना मात्र हे भुरटे चोर शोधूनही व माहिती देऊनही सापडत नाही. यामुळे परळी शहर पोलीस प्रशासनाच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

भुरट्या चोरांचा आणि पोलिसांचा जसं काही साठेलोटच आहे असंच चित्र सध्या तरी परळी शहरात दिसून येत आहे.

परिसरातील चोरीचे सूत्र जर थांबले नाही तर या प्रकरणाचा सविस्तर अहवाल तयार करून जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्याकडे भुरट्या चोरांचा बंदोबस्त करावा याची मागणी करण्यात येणार आहे.

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!