महाराष्ट्र

परळी जवळ पंढरपुर यात्रा स्पेशल अकोला विभागातील एसटीचा अपघात

Terrible ST accident in Kanherwadi, adjacent to Parli city

वारंवर बातम्या आणि सुचना देऊनही राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणा व गलथान कारभारामुळे रघुनाथराव पेट्रोल पंपाजवळ पंढरपुर यात्रा स्पेशल अकोला विभागातील एसटीचा भीषण अपघात

परळी शहरा लगत आसलेल्या कन्हेरवाडी येथील पंपाजवळ नेहमी होणाऱ्या व काल झालेल्या अपघातास जबाबदार कोण ? – अँड.मनोज संकाये

केशव डी मुंडे वेगवान मराठी प्रतिनिधी परळी वैजनाथ -दिनांक 8 जुलै 2025 परळी अंबाजोगाई महामार्गावरील कन्हेरवाडी येथे असणाऱ्या रघुनाथ मुंडे पेट्रोल पंपाजवळ बसचा भीषण अपघात झाला त्यामध्ये प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळाली

वारंवार बातम्या देऊन आणि अधिकाऱ्यांना सांगून सुद्धा महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा भीषण प्रकार घडला घडला असून याला जबाबदार कोण असा सवाल सामाजिक कार्यकर्ते अँड.मनोज संकाये यांनी केला आहे.

काल रात्री हा अपघात झाला आहे. थातूरमातूर रेडियम चे रघुनाथ मुंडे पेट्रोल पंपाजवळ राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी काम केल्याने ते निघून गेले परिणामी त्या ठिकाणी अपघात झाला

या अपघातामध्ये बसचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून त्यामध्ये असणाऱ्या प्रवाशांना सुद्धा शारीरिक हानी भोगावी लागली आहे.

अशा वारंवार घटना या अगोदरही याच ठिकाणी घडल्यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आहे. याकडे संबंधित महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष दिले असते तर अशी घटना घडली नसती भविष्यात

अशा घटना घडू नये यासाठी योग्य ती उपयोजना करणे गरजेचे आहे. अपघातामध्ये माणसांचा बळी जाण्याची शक्यता आहे

त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा लागेल अन्यथा रेडियमचे काम करून घ्यावे अन्यथा मित्र मंडळाच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!