क्राईमबीड

शाळेत घुसुण राडा करणाऱ्या टुक्कार गैंगवर तडीपारीचा गुन्हा दाखल

Case registered against Tukkar gang who entered school and created ruckus

!! शाळेमध्ये घुसून गुंडगिरी करणारे अटक.
बीड शहर पोलिसांची कामगिरी.!!

वेगवान मराठी प्रतिनिधी बीड केशव डी.मुंडे –दिनांक 23/07/2025 रोजी सावरकर प्राथमिक विद्यालयाच्या आवारात शाळेतील दोन मुलांच्या एकमेकांमधील किरकोळ भांडणाचे कारणामुळे पाथरूड गल्लीतील काही मुलांनी शाळेमध्ये घुसून मुलास आणि मुलाच्या पालकाला मारहाण केली होती. बीड शहर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून 15 आरोपींविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करून घेतला होता. सीसीटीव्ही फुटेज वरून सर्व आरोपी निष्पन्न झाले आहे.

या 15 आरोपी पैकी आठ प्रमुख आरोपी यांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. गुन्हा दाखल केल्या पासून काही आरोपी फरार होते. त्यातील चार आरोपी हे अल्पवयीन असल्याने त्यांना पालकांच्या ताब्यात दिली आहे.

अटक झालेल्या आरोपींची नावे खालील प्रमाणे आहेत.. 1. अनेश नरेश गायकवाड वय 25 वर्ष, 2 साहिल नरेश गायकवाड व 21 वर्ष, 3. शेखर रत्नाकर जाधव वय 31 वर्ष, आकाश पालकर जाधव वय 39 वर्ष. सर्व राहणार पात्रुड गल्ली अशी आहेत. यातील दोघेजण हे अभिलेखावरील गुन्हेगार आहे आणि त्यांच्यावर अगोदरच मारहाणीची गुन्हे दाखल आहेत.

अशा गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस अधीक्षक श्री नवनीत काँवत यांनी सांगितले आहे

अशा घटना पुन्हा होऊ नये यासाठी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी आरोपी अटकेबाबत सविस्तर सूचना दिल्या होत्या.

सदरील कामगिरी ही पोलीस अधीक्षक श्री नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे बीड शहरचे पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ, पोउपनि महेश जाधव, पो.ह. संजय राठोड, गहिनीनाथ बावनकर, राम पवार, बापू गायकवाड यांनी केली आहे.

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!