
!! रा.काँ.पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आ.रोहित पवार आज परळीत !!
!! महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांच्या घरी देणार आहेत भेट सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे – तालुकाध्यक्ष देवराव लुगडे यांचे आवाहण! !!
वेगवान मराठी प्रतिनिधी केशव डी मुंडे परळी येथील महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी आज मंगळवार दि. 29 जुलै 2025 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा आमदार रोहित पवार परळीत येत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे परळी तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज यांनी दिली आहे.
आज दुपारी 4.00 वाजता महादेव मुंडे यांच्या निवासस्थानी ते भेट देणार आहेत. तब्बल 22 महिने उलटूनही महादेव मुंडे यांच्या हत्येतील आरोपी अटक नाहीत किंवा या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने होताना दिसत नाही.
मागच्या काही दिवसापूर्वी मयत महादेव मुंडे यांचे फोटो महाराष्ट्रभर वायरल झाले आणि एकच हळहळ उमटली या सर्व प्रक्रियेमध्ये तपास व आरोपींना तात्काळ अटक व्हावी तसेच या प्रकरणा बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी मयत महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांची भेट घेण्यासाठी
आमदार रोहित पवार हे आज परळीत येत असल्याची माहिती तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज यांनी दिली असून पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन लुगडे महाराज यांनी केले आहे.

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.








