
!! ज्योतिर्लिंग वैद्यनाथ मंदिरातील वंशपरंपरागत पुजाऱ्याशी जबरदस्तीने पैसे हिसकावले !!
!! विश्वस्त राजेश देशमुख सह तिघांविरोधात तक्रार दाखल !!
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) –केशव डी मुंडे वेगवान मराठी दिनांक 1 आगस्ट 2025
परळीतील प्रसिद्ध वैद्यनाथ मंदिरातील वंशपरंपरागत पुजारी विवेक शंकर पुजारी यांनी गंभीर आरोप करत परळी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.त्यांच्या म्हणण्यानुसार, दिनांक 28 जुलै 2025 रोजी रात्री 9 ते 10 वाजण्याच्या दरम्यान
शयन आरतीच्या वेळेस ओम नागनाथअप्पा वाघमारे, विजय नारायणअप्पा घोंगडे आणि जगन्नाथ बाबुराव वाघमारे या तिघांनी वैजनाथ देवल कमिटीचे विश्वस्त राजेश देशमुख यांच्या सांगण्यावरून त्यांच्या हातातील भक्तांनी स्वेच्छेने दिलेली दक्षिणा जबरदस्तीने हिसकावून घेतली.
विशेष म्हणजे, हे कृत्य त्यांनी जयवंत उर्फ राजेश विठ्ठलराव देशमुख यांच्या सांगण्यावरून केल्याचे स्पष्टपणे बोलून दाखवले, असे पुजारी विवेक शंकर पुजारी यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.
तक्रारदाराच्या मते, राजेश देशमुख हे देवस्थानचे विश्वस्त असून सूडबुद्धीने सातत्याने मानसिक व शारीरिक त्रास देत आहेत, तसेच जातीवाचक शब्द वापरत अपमान करत आहेत.
या घटनेमुळे विवेक पुजारी यांना अत्यंत मानसिक त्रास झाल्याचे ते म्हणाले. त्यांनी हायपरटेन्शनचा झटका आल्याने शुद्ध हरपली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 29 जुलै रोजी त्यांना रुग्णालयातून सुटका देण्यात आली.
पुजारी यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की, जयवंत देशमुख हे सतत त्रास देत असून भविष्यात त्यांच्या किंवा त्यांच्या कुटुंबीयांच्या जिवीताला धोका निर्माण झाला, तर त्याला जबाबदार जयवंत उर्फ राजेश देशमुख असतील.
या प्रकरणी परळी शहर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी संबंधित घटनेची चौकशी सुरू केली आहे. विवेक पुजारी यांनी या गंभीर प्रकारावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.








