आरोग्यबीड

DR.दिनेश लोढा परळी येथील वैद्यकिय क्षेत्रातील QR CODE प्राप्त पहिले ड्रॉक्टर

Dr. Dinesh Lodha is the first doctor from Parli Vaijanath to receive a QR code.

वैद्यकिय क्षेत्रात बोगस डीग्री घेऊन रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्या ड्रॉक्टरांचा परळी शहर आणि तालुक्यासह राज्यात सर्वत्र सुळसुळाट झाला आहे

काही महाभाग तर असे हि आहेत की जे १०वी /१२ वी नापास आसले तरी एखाद्या दवाखान्यात चार दोन वर्षे हेल्पर म्हणुन काम करतात आणि मिळालेल्या थोड्या बहुत माहितीच्या आधारे गळ्यात धोपटी बांधुन ग्रामिन भागातील नागरीकांना इंजेक्शन गोळ्या आणि स्लाईन देत फिरत असतात

या सर्व बोगसगिरीला आळा घालण्यासाठी शासनाने सर्व ड्राॉक्टरांना QR कोड काढणे आणि तो दवाखान्यात लावणे अनिवार्य केले आहे

परळी वैजनाथ येथील सुप्रसिद्ध व नामांकीत दंत रोग तज्ञ ड्रॉ.दिनेश लोढा हे परळी तालुक्यातील QR CODE मिळवणारे वैद्यकिय क्षेत्रातील पहिले ड्रॉक्टर ठरले आहेत या सिस्टिममुळे इतरांचे पितळ उघडे पडण्यास सुरूवात होणार असुन बोगसगिरीला आळा घालण्यात मदत होणार आहे

तर बोगस वैद्यकिय सेवा देणाऱ्यांवर कडक कारवाई होणार असुन नागरीकांची चुकीच्या उपचार पद्धती पासुण सुटका होण्यास मदत होणार आहे

ड्रॉ.दिनेश लोढा यांच्याप्रमाणे इतर ड्राॉक्टरांनी देखील या सिस्टिमचा तात्काळ अवलंब करुण सिस्टिम मध्ये पारदर्शकता आणण्यासाठी QR कोड काढुण घेतला पाहीजे असे सुज्ञ नागरीकांडुण बोलले जात आहे

बोगस डॉक्टरांना आळा घालण्यासाठी आणि रुग्णांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने (MMC) ‘नो युवर डॉक्टर’ (KYD) ही QR कोड आधारित प्रणाली अनिवार्य केली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून रुग्ण थेट आपल्या मोबाईलवर डॉक्टरांची खरी माहिती तपासू शकतात.

QR कोड प्रणालीची प्रमुख वैशिष्ट्ये:

डॉक्टरांची माहिती: क्लिनिकमधील QR कोड स्कॅन केल्यावर डॉक्टरांचे संपूर्ण नाव, नोंदणी क्रमांक, पदवी (शैक्षणिक पात्रता) आणि नोंदणीची वैधता मोबाईलवर दिसते.

बोगस डॉक्टरांना आळा:

याद्वारे डॉक्टर अधिकृत आहेत की नाही हे काही सेकंदात स्पष्ट होते, ज्यामुळे रुग्णांची फसवणूक टळू शकते.

अनिवार्यता:

सर्व नोंदणीकृत डॉक्टरांनी त्यांच्या क्लिनिक किंवा दवाखान्यात हा QR कोड प्रदर्शित करणे कायद्याने बंधनकारक आहे.अधिकृत माहितीसाठी आणि डॉक्टरांच्या पडताळणीसाठी तुम्ही Know Your Doctor प्लॅटफॉर्मचा वापर करू शकता.

@ ✍️ केशव डि मुंडे उप-संपादक वेगवान मराठी न्युज नेटवर्क महाराष्ट्र  📞8888 387 622 @

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!