परळी येथील वाचनालयास अजित पवारांचे नाव देण्याची मागणी
Demand to name the reading room at Parli Vaijnath after Ajit Pawar

डॉ भालचंद्र वाचनालय इमारतीला लोकप्रिय उपमुख्यमंत्री “लोकनेते अजितदादा पवार” यांचे नाव देण्यात यावे.
समस्त परळीकरांची लेखी निवेदनाद्वारे नगर पलीकेकडे मागणी
वेगवान मराठी प्रतिनिधी केशव डि मुंडे दि 13 फेब्रुवारी 2026
परळी शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या डॉ भालचंद्र वाचनालय या इमारतीस लोकप्रिय कार्यसम्राट उपमुख्यमंत्री “लोकनेते अजितदादा पवार भवन” हे नाव देण्यात यावे अशी मागणी समस्त परळीकरांच्या वतीने लेखी निवेदनाद्वारे नगर पालिकेकडे करण्यात आली आहे.
या निवेदनात परळी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी यांच्याकडे लेखी मागणी करताना परळी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या डॉ भालचंद्र वाचनालय या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून सदरील इमारतीस महाराष्ट्र राज्याचे कार्यसम्राट व लोकप्रिय उपमुख्यमंत्री “लोकनेते अजितदादा पवार भवन” असे नाव देण्यात यावे ही समस्त परळीकरांची जनभावना आहे.
या जनभावलेचा विचार करून परळी नगर परिषदेने तात्काळ याची अंमलबजावणी करावी व उपमुख्यमंत्री अजित दादा यांचे नाव तात्काळ देण्यात यावे. अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली.
या प्रसंगी निवेदन देताना सामाजिक कार्यकर्ते सेवकराम जाधव, देवराव लुगडे महाराज, उत्तमदादा माने, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नगरसेवक तथा गटनेते नितीन बागवाले शरद चव्हाण
माजी नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते शरीफ भाई शेख, अमर रोडे, नितीन शिंदे, शिवाजीराव देशमुख, बाबासाहेब शिंदे, दिनेश गजमल, रणजीत देशमुख, अरुण सपाटे, प्रल्हाद साबळे, योगेश नानवटे यांच्यासह अनेक सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.







