क्राईमबीड

मोक्का ने फिर से ठोका !! गोट्या सह सर्व आरोपींचे मोक्का मध्ये पुनर्वसन

All the accused including Gotya Geete in the case of Sahdev Satbhai from Parli are again facing charges.

!!! मोक्का अंतर्गत झालेल्या कारवाई तुन वगळलेल्या परळीतील गुन्हेगारांचे पाय आणखी खोलात !!!

!!! चार दिवसापुर्वी तडोळी येथील सहदेव सातभाई यांच्या केस मध्ये मोक्का लागलेल्या गोट्या गीते सह इतर 4 आरोपींना सबळ पुराव्या आभावी दोषमुक्त करण्यात आले होते !!!

!!! दरम्यान आरोपींची गुन्हेगारी पाश्र्वभूमी व घटणेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयास स्थगिती देण्यात आली आहे !!!

बीडचे पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांनी या प्रकरणी विशेष लक्ष केंद्रीत केल्यामुळे कायद्याच्या पळवाटीतुन निसटलेल्या गुन्हेगारांना हा मोठा धक्का आहे !!!

परळी येथील गोटया ऊर्फ ग्यानबा गित्ते व इतर 04 यांचेवर मोक्का कायदयांतर्गत कारवाई करणे बाबत पोलीस महासंचालक कार्यालयाची मंजुरी.

वेगवान मराठी केशव डि मुंडे परळी-बीड दिनांक 01/03/2025 रोजी मा. न्यायालयाचे आदेशान्वये पो.स्टे. परळी शहर गुरनं 44/2025 कलम 307, 326,392,394,323,324,504,506,34 भादवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर गुन्हयातील फिर्यादी नामे सहदेव वाल्मीक सातभाई यांना दिनांक 18.10.2023 रोजी जलालपुर रोडच्या कमानीजवळ दुचाकी समोर पांढ-या रंगाची स्कॉर्पिओ MH4420806 आडवी लावुन आरोपी रघुनाथ फड व ईतर 7 ते 8 जनांनी आडवुन मारहाण करण्यात आली.

फिर्यादीचा मोबाईल व पॅन्टच्या खीशातील 2,70,000/- रुपये रोख कावुन घेतले वगैरे मचकुराचे फिर्याद वरुन सदरचा गुन्हा CIPC कलम 156(3) अन्वये मा. न्यायालयाचे आदेशाने दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्यात यापुर्वी मा. श्री विकेंद्र मिश्र, विपोमनि छत्रपती संभाजीनगर यांनी मोक्का कायदयाच्या कलमांचा अंतर्भाव करण्याची परवानगी दिनांक 07/05/2025 दिली होती.

त्यावरुन तत्कालीन तपासी अधिकारी श्री अनिल चोरमले उपविपो अंबाजोगाई यांचे कडे तपास देण्यात आला होता. त्यांनी सदर गुन्ह्यातील आरोपी रघुनाथ रामराव फड यास अटक करुन तपास केला.

सदर गुन्हयांतील आरोपी नामें 1) रघुनाथ रामराव फड रा. रामनगर परळी (टोळी प्रमुख) 2) ग्यानबा ऊर्फ गोटया मारुती गित्ते वय 36 वर्षे रा. नंदागौळ ता. परळी 3) धनराज ऊर्फ राजेश श्रीरंग फड वय 31 वर्षे रा. कन्हेरवाडी ता. परळी 4) विलास बालाजी गिते वय 27 वर्ष रा. नंदागौळ ता. परळी वै.

5) जगन्नाथ विक्रम फड वय 45 वर्ष रा. बजरंग नगर परळी वै. जि. बीड. 6) बालाजी अंकुश दहीफळे वय 24 वर्ष रा, माणिक नगर परळी वै. 7) सुदिप रावसाहेच सोनवणे वय 28 वर्ष रा. सिध्वर्थ नगर परळी वै. जि. बीड यांचे विरुध्द पुरावा उपलब्ध झाल्याने

तपासी अधिकारी श्री ऋषीकेश शिंदे सपोअ अंबाजोगाई यांनी अपर पोलीस महासंचालक, (का. व सु) म.रा. मुंबई यांना मोक्का कायदांतर्गत दोषारोप पत्र दाखल करण्याची परवानगी मागण्यासाठी अहवाल सादर केला होता.

मा पोमस कार्यालय म.रा. मुंबई यांनी दिनांक 28/08/2025 रोजी सदर गुन्हयांतील आरोपी रघुनाथ रामराव फड व धनराज ऊर्फ राजेंश श्रीरंग फड अशा दोन आरोपी विरुध्द मोक्का कायदयांतर्गत दोषारोप पत्र दाखल करण्याची परवानगी दिली होती.

त्यानंतर पुन्हा श्री नवनित काँवत पोलीस अधीक्षक बीड यांनी सदर प्रकरणांतील उर्वरीत 05 आरोपी विरध्द मोक्का कायदयांतर्गत दोषारोप पत्र न्यायालयास दाखल करण्यासाठी पुनरावलोकन होवुन परवानगी मिळण्यासाठी दिनांक 23.09.2025 रोजी अहवाल पाठविला होता.

त्यावरून पोमसं कार्यालय मुंबई यांनी दिनांक 25.09.2025 रोजी गोटया गिले व इतर 04 जनाविरुध्द परवानगी दिली आहे. सदर गुन्हयांचा पुढील तपास श्री. नवनीत कौवत (भापोसे), चेताना तिडके अपोअ अंबाजोगाई यांचे मार्गदर्शना खाली श्री ऋषीकेश शिंदे अपोअ तथा उविपाअ अंबाजोगाई हे करत आहेत.

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!