क्राईमबीडमहाराष्ट्र

पोलीस का करत आहेत राजस्थानी मल्टिस्टेटच्या संचालकांची चाकरी

Why are the police serving the directors of Rajasthani multistate companies?

तब्बल अकरा महिने राजस्थानी मल्टिस्टेटचा एकही फरार संचालक न सापडणे हे बीड पोलिसांचे अपयश

पीडितांचा गुन्हा तो काय ? ठेवीदारांकडे का बघताहेत पोलीस पाकीस्थानी आतिरेक्यां प्रमाणे

परळी प्रतिनीधी :दिनांक 23 मार्च- चार दिवसापुर्वी राजस्थानी पोद्दार स्कुलचा प्रिंसिपल बि.पी.सिंग याने एक व्हिडीओ प्रसारीत करत यापुढे पोद्दार स्कुल वर धनंजय मुंडे त्यांचे बंधु अजय मुंडे यांचे नियंत्रण राहणार आसुण त्यांच्या संरक्षणात पोद्दार स्कुलचा कारभार चालणार आसल्याचे जाहिरपणे सांगीतले…

या घटणेमुळे आगोदरच परेशान आसलेले ठेवीदार बेभान झाले आणि ठेवीदारांनी कृती समीतीस मिटींग लावण्याची विनंती केली..

शुक्रवार दिनांक 21 मार्च रोजी कृती समिती च्या बैठकीत ठेवीदारांनी धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाशी संपर्क साधुन या बद्ल सत्यता जाणुन घेण्याचा एकमुखी ठराव केला आणि अजय मुंडे यांच्याकडे भेटीची वेळ घेतली…

दरम्यान शनीवार दिनांक 22 मार्च रोजी 11 वाजताची वेळ अजय मुंडे यांच्याकडुण ठेवीदारांना देण्यात आली ! ठरलेले वेळेत ठेवीदार धनंजय मुंडे यांच्या संपर्क कार्यालयात दाखल झाले आणि कार्यालयात उपस्थित असलेल्या रुपनर साहेबां बरोबर एक तास या विषयावर चर्चा केली व व्हायरल व्हिडिओ ठेवीदारां सोबत फोनवर बिपी सिंग यांनी ठेवीदारांना उद्दट भाषेत केलेले संभाषण आणि परत संभाषणात धनंजय मुंडे यांच्यासह मुंडे कुटंबातील नावांचा उल्लेख करुण दमदाटी केलेली रेकौर्डींग व कागदोपत्री पुरावे सुपुर्द केले…

या नंतर अजय मुंडे आल्यानंतर या संबंधीत प्रकारा बद्दल त्यांना विचारणा केली आसता , आमचा पोदार स्कुलचची रौयल्टी व रद्द केलेला ब्रँड मिळवून देण्यापलीकडे कसलाच संबंध नसल्याचे सांगीतले याचा अर्थ बिपी सिंग मुंडे कुटुंबाचा आणि धनंजय मुंडे यांच्या नावाचा गैरवापर करुण पालक आणि ठेवीदारां मध्ये दहशत पसरवुण शाळेतील वर्षभरातील जमा पुंजी हाडपण्याचा प्रयत्न करतोय हे निष्पन्न झाले…

यावेळी अजय मुंडे यांनी ओपन साऊंडवरुण बिपी सिंग यास या बाबतीत जाब विचारला आसता बिपी सिंग यांनी तो खोटे बोलल्याचे मान्य करुण अजय मुंडे यांची माफी देखील मागीतली…

*चौकट*

या प्रकरणाचा मुळ विषय आसा आहे

मल्टीस्टेटच्या घटणे नंतर संचालक मंडळ फरार झाले !
त्यावेळेस पासुण शाळेतील खर्च होऊण उरलेली रक्कम हि ठेवीदारांना देण्याचे व्यवस्थापक मंडळाने जाहीर केले

गंगाखेड येथील व्यवसायीक मंदाकिनी बंडु मुंडे यांच्यावर संचालक मंडळानी अधिकृत जबाबदारी सोपवली,त्यांच्या सोबत देखील ठेवीदारांना उर्वरित रक्कम देण्याचे ठरले …

पुढे बिपी सिंग चे बंडु मुंडे व नंतर मंदाकीनी मुंडे यांचे ही बिनसले तेंव्हा बिपी सिंग ठेवीदारांकडे केफीयत घेऊण आले आणि मंदाकिनी बंडु मुंडे यांच्या कडुण माझ्या जिवाला धोका निर्माण झाला आसुण तुम्ही मला संरक्षण द्या म्हणुन विनवणी करत होते

तेंव्हा ठेवीदार कृती समितीचे अध्यक्ष सेवकराम जाधव यांनी त्याला पोलीसात जाण्याचा सल्ला दिला आणि काही काळ सुरळीत गेल्या नंतर परत शाळेत खटके उडायला सुरुवात झाली प्रत्येक वेळी बिपी सिंग ठेवीदारांना मार्च महिण्यात शाळेचा हिशोब आणि उर्वरित रक्कम प्रशासक लागे पर्यंत ठेवीदारांच्या निगराणीत सुरक्षित ठेवण्याचे अश्वासण देत होता…

अखेर तो दिवस आणि महिणा उजडला तेंव्हा मात्र ठेवीदारांसह मंदाकिनी बंडु मुंडे यांना तो मी नव्हेच या भुमिकेत बिपी सिंग आला आणि शिक्षकी पेशाला न शोभणारी भाषा बोलु लागला,

एखाद्या सराईत गुंडा प्रमाणे बिपी सिंग ठेवीदारांना आणि शाळेचे नियुक्त व्यवस्थापक मंदाकिनी बंडु मुंडे यांना बघुण घेण्याची धमकी वजा उर्मट भाषा बोलु लागला,

त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या कार्यालया कडुण भुमीका स्पष्ट करण्यात आल्या नंतर ठेवीदार पोदार शाळेत दाखल झाले आणि बिपी सिंग यांना ठरलेल्या वायद्या बद्दल विचारणा करत आसताना बिपी सिंग यांनी उडवा उडवीची उत्तरे देऊ लागला जेंव्हा विषय खऱ्याला लागुण अंगलट येण्याची शक्यता दिसु लागली ,

तेंव्हा बिपी सिंग याने महिला ठेवीदारां सोबत हुज्जत घालायला सुरुवात केली आणि दोन महिला ठेवीदारांच्या हाताला धरून रिस्पशेन हौल मधून त्याच्या औफीस मध्ये ओडत आसताना महिला ठेवीदारांच्या बांगड्या फुटुण त्यांच्या हाताला जख्मा झाल्या आसता स्व संरक्षणार्थ बिपी सिंग याला चोप देण्यात आला…

हा झाला इथ पर्यंतचा घटणाक्रम परंतु पोलीस प्रशासणाने बीपी सींग आणि संचालकांचे शंभर गुन्हे सोडुण दिले, फरार आरोपींना शाळेतील रक्कम पुरविणारा देखील गुन्हेगारच आसतो ते पण सोडले आकरा महिणे उलटले तरी पोलीसांना फरार झालेले एका हि संचालकास अटक करण होईना , ते पण नंबर आणि ठिकाणासह पुरवुन

अकरा महिण्यात एकट्या परळीतील पाच ठेवीदारांनी हाय खाऊन मृत्युला कवटाळले त्याची दखल नाही,संचालकांवर गुन्हा नोंद करुण घेण्यासाठी तब्बल दिड महिणा लावले,फरार आसलेल्याच्या दुकानांवर कारवाई करायचे सोडुण त्यांना संरक्षण देण्याचे पाप पोलीस करताहेत यापेक्षा दुर्दैवी काय आसु शकते..

परंतु या पोलीसांना त्या बिपी सिंग चा इतका पुळका की हाजारावर पिडीत ठेवीदारांना न्याय द्यायचे सोडुण ठेवीदारांनाच धमकावत कायद्याची भिती दाखवुण गप्पगार करण्याचा जिवतोडुन सुपारी घेतल्यागत प्रयत्न केला जातोय !

खाकीचा दम दाखवायचाच आसेल तर तो गोर गरीब लोकांच्या लेकरांच्या तोंडातला घास काढुण पै पै जमविलेल्या अयुष्यभराच्या कष्टाच्या पुंजीवर भर दिवसा डाका टाकणाऱ्या फरार संचालकांना बेड्या घालुन दाखवावा ना की पिडीत ठेवीदारां नां धमकाऊण

ठेवीदारांना जर योग्य वेळी न्याय दिला आसता तर पुढील प्रसंग ओढावले नसते,कोणाचा बाप,कोणाची माय,कोणाचा भाऊ,कोणाची पत्नी आणि कोणाच्या पतिने जिव दिला नसता आया बहिणींचे कुंकु पुसले गेले नसते,

कोणाचे लेकरंबाळं ऊघड्यावर आले नसते अनेकांच्या मुलीबाळीचे लग्न मोडले नसते उपचारा वाचुन कोणाचे घरातले कर्ते कमविते प्राणास मुकले नसते…

याबरोबरच पैशा आभावी अनेक जनांना शिक्षणा पासुण वंचित राहावे लागत आहे त्यामुळे त्या कुटुंबाची एक पिढी बरबाद होत आहे या सर्व विषयाला कोण जबाबदार आहे? विनाकारण लोकांच्या जिवाशी खेळण्याचा आधिकार कोणी दिलाय?

ठेवीदार न्याय मागत आहेत तर त्यांच्याकडे तुम्ही पाकीस्थानी आतिरेक्यांप्रमाणे आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करायलात आणि चोरांना ताठ मानेने संरक्षण द्यायलात हा कुठला कायदा आणि हा कसला न्याय? आपणे गिरेबांन मे झांक कर देखे तो ठिक रहेगा….

ठेवीदार हे प्राण गेला तरी हा अन्याय सहन करणार नाहित याची सर्व लबाडांच्या टोळीने खुण गाठ बांधावी यात शंकाच नाही

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!