क्राईमबीडमहाराष्ट्र

परळीच्या तरुणीची भुसावळ मध्ये गळा दाबून हत्या

A young woman from Parli was strangled to death in Bhusawal!

वेगवान मराठी प्रतिनिधी जळगांव –बीड जिल्ह्यातील नागरीकांना विशेषता परळी तालुक्यातील लोकांना स्थानीक पातळीवर उधोग धंदे नसल्याने कायम स्थलांतरीत होऊण पोटाची खळगी भरण्यासाठी कायम भटकंती करावी लागते !

परळी तालुक्यातील बहुतांश तरूण हे परळी मतदार संघात हाताला काम नसल्याने पुणे,मुंबई सारख्या ठिकाणी पडेल ते काम करतात ! काही लोक ऊस तोडणी करण्यासाठी वन वन भटकतात,तसेच काही जन विटभट्ट्यांवर झोपड्या घालुण तिकडेच राहतात हे प्रस्थापीत सत्ताधारी राजकारण्यांचे स्पेशल अपयश आहे ! कारण मागील पाच पन्नास वर्षांच्या काळात देखील या भागाचा शास्वती विकास न होणे ही बाब अत्यंत निंदनीय व शर्मनाक आहे

आशी घडली घटणा ? आणि कसा आहे घटणाक्रम 👇परळीच्या तरुणीची भुसावळ मध्ये गळा दाबून हत्या! ! 

दारूच्या नशेत पतीने पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना भुसावळ तालुक्यातील वेल्हाळा शिवारात समोर आली आहे.

आज भल्या भल्या पहाटे समोर आलेल्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान पत्नीची हत्या केल्यानंतर संशयित आरोपी पती फरार झाला आहे. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरु करण्यात आला आहे.

जळगावच्या भुसावळ तालुक्यातील विल्हाळा शिवारात घटना घडली असून सना शेख असे घटनेत मृत महिलेचे नाव आहे. दरम्यान विल्हाळा शिवारात किशोर पाटील (रा. सुसरी) यांची विटभट्टी आहे.

या वीटभट्टीवर बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील नियाजउद्दीन शेख मन्सूर कुटुंबासह कामाला असून याच ठिकाणी ते वास्तव्यास होते.

तर त्यांच्यासोबत मुलगी सना आणि जावई अजीज सलीम शेख हे देखील चार मुलांसह विटा तयार करण्याचे काम करीत होते.

सर्व कुटुंब एकाच परिसरातील पत्र्याच्या खोल्यांमध्ये राहत होते.

अजीज सलीम शेख याला दारूचे व्यसन असल्याने दारू पिऊन रोज पत्नीशी वाद घालत होता. २२ मार्चला देखील दारूच्या नशेत अजीज शेख घरी आला. यानंतर त्याने पत्नी सना (वय २५) हिला शिवीगाळ करू लागला.

शेजारी असलेल्या सासूने दोघांचे भांडण ऐकून अजीज यास शांत करण्याचा प्रयत्न केला. थोड्यावेळाने वाद कमी झाल्यानंतर अजीज व सना हे दोघेजण मुलांसह झोपण्यासाठी गेले.

दरम्यान आज पहाटे सना हिची आई कामासाठी उठवायला गेल्यानंतर खोलीतून प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे दरवाजा तोडून पाहिले असता सना रक्तबंबाळ अवस्थेत मृत पडल्याची दिसून आली.

घरातील हे दृश्य पाहून सना हिची आई व अन्य मजूर हादरले होते. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

दरम्यान गळा आवळून सण हिची हत्या करण्यात आल्याचा संशय असून सना हीच पती अजीज फरार आहे. त्याचा शोध जळगाव पोलीस करत आहेत

वेगवान मराठी न्युज नेटवर्क समुह महाराष्ट्र इंडिया 

 

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!