महाराष्ट्र
फर्दापूर पोलिसांनी केली ही कारवाई
वेगवान मराठी / विजय चौधरी
फर्दापूर, ता. 25 एप्रिल 2024 – येथील शेख अजीज मजीत यांच्या घरासमोरून दिनांक 23 एप्रिल पहाटे सहा वाजेच्या सुमारास त्यांच्या मालकीची पॅशन कंपनीची मोटार सायकल चोरी गेली होती .
शेख अजीज यांनी याबद्दल फर्दापूर पोलिसात तक्रार दिली, असता पोलीस सहायक निरीक्षक प्रफुल साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट अंमलदार निलेश लोखंडे यांनी तपास गतिमान करून जामनेर तालुक्यातील पहूर येथील जुबेर भिकन पठाण या आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्या कडून चोरी केलेल्या पॅशन व हिरो स्पेलंडर कंपनीच्या एकूण 65000 रुपयांच्या दोन मोटरसायकल ताब्यात घेतल्या आहेत.
