संदीपान भुमरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

वेगवान मराठी / विजय चौधरी
संभाजीनगर, ता. 25 एप्रिल 2024- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत दि.२५ छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधीकृत उमेदवार संदीपान भुमरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला.
याप्रसंगी आयोजित प्रचार रॅली काढण्यात आली तसेच गुलमंडी येथील सभेस मुख्यमंत्री यांनी संबोधित केले यावेळी ४२ अंश तापमान असतांना देखील महायुतीचे कार्यकर्ते,पदाधिकारी, महिला प्रचंड मोठ्या संख्येने व उत्साहाने याठिकाणी उपस्थित होते.
याप्रसंगी मा.ना रावसाहेब दानवे, मा.ना भागवत कराड, मा.ना दादा भुसे,ना.अतुल सावे, मा. आ प्रदीप जैस्वाल, मा. आ. संजय शिरसाठ, मा. आ. प्रा रमेश बोरनारे, मा. आ प्रशांत बंब, शिवसेना जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ, शिवसेना जिल्हाध्यक्ष रमेश पवार, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर, मनसे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर, ऋषिकेश जैस्वाल आदींसह महायुतीतील सर्व पक्षाचे पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
