पोलिसांची मोठी कारवाई, ७१४०००० लाखाचा मुद्देमाल जप्त

वेगवान मराठी / राजेश जांभूळे
नागपूर, ता. 1 में 2024 – नागपूर भिवापूर हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय मिळालेल्या माहितीवरून भिसी -उमरेड मार्गाने जात असलेले ४ ट्रक टिप्परमध्ये भरून असलेली २८ ब्रास रेती किमती १४,oooo/- रुपये तसेच ४ ट्रक टिप्पर ची किंमत ७ ००० ०००/- लाख रुपये असा एकूण ७१४ ००००/- लाख रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरच्या कारवाईने अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या माफिया चे धाबे चांगलेच दणाणले आहे. याबाबत पोलिस स्टेशन भिवापूर येथे कलम ३७९, १०९, ३४ भादवि व विविध कलमान्वये प्रतिबंधक अधिनियम १९८४ अन्वये गुन्हा नोदविण्यात आला.स
दरची कारवाई पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार यांचे मार्गदर्शनात ठाणेदार जयप्रकाश निर्मल, पोलिस उपनिरीक्षक संदीप सेडमेक,पोलीस उपनिरीक्षक किरण महागावे, एएसआय अशोक ठाकूर, पोलिस नाईक रवि जाधव, पोलिस कास्टेबल मनोज चाचरे, पोलिस कॉन्स्टेबल निकेश आरेकर, पोलिस कांस्टेबल दीपक ढोले, पोलिस कॉन्स्टेबल प्रीतम खोपे यांच्या उपस्थितीत पार पडली.
