रेशनचे धान्य मिळत नाही ८० कोटी जनतेच्या गप्पा सांगू नकाः दानवेंना भर सभेत जाब

वेगवान नाशिक / विजय चौधरी
संभाजीनगर, ता. 30 एप्रिल 2024- ही आमचे रेशनचे धान्य बंद केले आहे आम्हाला त्या अंशी कोटी लोकांच्या गप्पा नका सांगू आमचे धान्य का बंद आहे. Don’t talk about the fact that 80 crore people have received grain – Raosaheb Danvena replied in the meeting
याबाबत तालुका प्रशासन दरबारी ओरड मांडा असा भर सभेत लाभार्थ्यांनी जाब विचारुन सभेत मार्गदर्शन करतांना खासदार रावसाहेब दानवे यांना दोन मिनिटे भर सभेत स्तब्ध केल्याचा प्रकार सोमवारी राज्य आणि केंद्राच्या दोन मंत्र्यांच्या सभेत जरंडी (ता सोयगाव) येथे घडला.
दरम्यान केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनीही ग्रामस्थांची समजूत काढून आधी ऐकून तर घ्या ऐकल्याशिवाय कसे समजेल असे प्रत्युत्तर देऊन वेळ मारून नेली आहे ..
जालना लोकसभाचे महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ सोमवारी मतदार संघाचे शेवटचे टोक समजले जाणाऱ्या जरंडीतून सुरुवात करण्यात आली होती. यावेळी मंत्री अब्दुल सत्तार,केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रचार सभेला मार्गदर्शन करताना मंत्री रावसाहेब दानवे यांनी भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील ८० कोटी जनतेला २०२२ पर्यंत मोफत रेशनचे गहू व तांदूळ दिल्या चा मुद्दा काढताच साहेब आम्हाला दोन वर्षांपासून रेशनचे धान्य मिळत नाही ते आधी सुरू करा.
आमच्याकडे तीन एकर शेती आहे, काय खावे दुष्काळात धान्य मिळत नाही, असा जाब थेट सभेत दोन्ही मंत्र्यांना विचारला. त्यावेळी मंत्री सत्तार स्तब्ध झाले तर दुसरे मंत्री रावसाहेब दानवे यांनी भाषण पुढे सुरू ठेवत आधी ऐकून घ्या त्याशिवाय समजणार नाही असे बोलून वेळ मारुन नेली.
