ब्रेकिंग अजिंठा घाटात पुणे-रावेर बसचा भीषण अपघात

वेगवान मराठी /विजय चौधरी
सोयगाव:पुणे -रावेर बसचा अजिंठा घाटात अपघात झाला असून यात नऊ प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत पुणे येथून रावेर जाणारी एमएच40 वाय 5197 ही बस अजिंठा घाटात दुपारी एक वाजेच्या सुमारास रस्त्याच्या बाजूने पलटी झाली यात नऊ प्रवाशी गंभीर जखमी झाले घटनेची माहिती फर्दापूर पोलिसांना मिळताच पोलीस सहायक निरिक्षक प्रफुल साबळे यांनी आपल्या सहकार्यासह घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्य सुरू केले आहे.
नऊ जखमीना अजिंठा ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी हलविले व बाकी सुखरूप असलेल्या प्रवाशांना दुसऱ्या बस मध्ये बसवून दिले ही घटना अजिंठा पोलीस हद्दीत मध्ये येत असल्याने प्रफुल साबळे यांनी घटनेची माहिती अजिंठा पोलिसांना दिली
अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांची नावे खालील प्रमाणे आहेत
01)सुशिलाबाई दिनकर निर्खे वय 70 राहणार जामनेर जि जळगाव
2)सरुबाई शामराव पाटील वय 65 राहणार श्रीरामपूर
3)वसंत विठ्ठल पठारे वय 65 वर्षे राहणार सोयगाव
4)निखिल किरण पाटील वय 13 वर्षे श्रीरामपूर
5)सुमित्रा दिनकर निर्खे वय 48 वर्ष राहणार जामनेर (रेफर)
6)विजय हरी सूर्यवंशी वय 72 वर्ष राहणार जामनेर (रेफर)
7)संध्या वसंतराव पठारे वय 63 वर्ष राहणार सोयगाव
8)जय मला विजय सूर्यवंशी वय 60 वर्ष राहणार जामनेर
9)ज्योती साई चंद्र बासनेवल वर्ष 40 राहणार संभाजीनगरΠ
