महाराष्ट्र

महाराष्ट्रात वादळःगारपीट!वीजांचा कडकडाट व ढगांचा गडगडाट होणार!अलर्ट जारी

वेगवान मराठी

मुंबई, ता. Maharashtra Weather Update in Marathi : मे महिन्याचा दुसरा आठवडा सुरु झाला असून राज्यासह देशात अवकाळी पावसाचं संकट कोसळलंय. वादळी वाऱ्यासह वीजांचा कडकडाट आणि मेघ गर्जनेसह अनेक भागांमध्ये पावासाचा इशारा हवामान खात्याने दिलाय.

महाराष्ट्रावर वादळ व गारपीटचे संकट! हवामान विभागाचा अलर्ट जारी

राज्यासह देशात उन्ह पावसाचा खेळ सुरु आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि सोसाट्याचा वारा (40-50 किमी प्रतितास वेग) पाऊस पडण्याची शक्यता आहे. (maharashtra weather update unseasonal rain till 18 may orange alert in pune satara chandrapur)

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि सोसाट्याचा वारा (50-60 किमी प्रतितास वेग) पाऊस पडण्याची शक्यता आहे.

राज्यावर अवकाळी पावसाचे संकट कोसळलं असून आजपासून पुढील 4 दिवस म्हणजे 12 ते 18 मे पर्यंत अवकाळी पावसासह गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. बहुतांश जिल्ह्यांना यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. मध्य महाराष्ट्रात नाशिक, अहमदनगर, पुणे सातारा, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तर मराठवाड्यातील नांदेड आणि लातूर तर विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, बुलढाणा वाशिम जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह, गारपीट आणि पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!