महाराष्ट्र

मुख्यमंत्री नाशिक मध्ये येताच पोलीसांकडून त्यांची तपासणी सुरु

As soon as the Chief Minister arrived in Nashik, the police started checking him

वेगवान मराठी / WEGWAN MARATHI

मुंबई, ता. 16 – : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आज नाशिक (Nashik) दौऱ्यावर आहेत. दरम्यान एकनाथ शिंदे यांचं हेलिकॉप्टर नाशिक हेलिपॅडवर पोहोचताच पोलिसांनी त्यांच्या बॅगांची तपासणी केली. यामागे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या आरोपांची पार्श्वभूमी आहे. एकनाथ शिंदे बॅगांमधून पैसे घेऊन जात असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला होता. दरम्यान यावेळी एकनाथ शिंदे यांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलं असून आम्ही आताही बॅग घेऊन आल्याचं म्हटलं आहे.

महाराष्ट्रात वादळःगारपीट!वीजांचा कडकडाट व ढगांचा गडगडाट होणार!अलर्ट जारीसंजय राऊतांनी नेमका काय आरोप केला होता?

राज्यात लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रचाराचा धुरळा उडत असताना संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप केले होते. एकनाथ शिंदे यांनी नाशिकमध्ये येताना आपल्यासोबत पैशांनी भरलेल्या बॅगा आणल्याचा दावा संजय राऊतांनी केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच आपल्या हेलिकॉप्टरमधून मतदारांना वाटण्यासाठी पैसे आणल्याचा आरोप त्यांनी केला होता. संजय राऊतांनी एक्सवर व्हिडीओ शेअर केला होता.

दानवे रुपी दगडाला आता पुन्हा शेंदूर लावू नका

संजय राऊतांनी शेअर केलेला व्हिडीओ नाशिकमधील होता. या व्हिडीओत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरमधून उतरताना दिसत होते. हा व्हिडीओ पोस्ट करताना संजय राऊतांनी लिहिलं होतं की, “नाशिकमध्ये रात्रीस खेळ चाले. नुसता पै पाऊस… दोन तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा पोलिस का वाहत आहेत? यातून कोणता माल नाशिकला पोहचला? निवडणूक आयोग फालतू नाकाबंदी आणि झडत्या करत आहे.

रेशनचे धान्य मिळत नाही ८० कोटी जनतेच्या गप्पा सांगू नकाः दानवेंना भर सभेत जाब

महाराष्ट्रात अधिकृत बॅगा वाटप सुरु आहे”.

एकनाथ शिंदे आजही नाशिकमध्ये असून याच आरोपांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे नाशिकमध्ये हेलिपॅडवर दाखल झाल्यानंतर सर्वांसमोर त्यांच्या बॅगा उघडून तपासणी कऱण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. एकनाथ शिंदे यांना जेव्हा पत्रकारांनी संजय राऊतांनी बॅगांसंबंधी केलेल्या आरोपांबद्दल विचारलं तेव्हा त्यांनी आम्ही आताही बॅग घेऊन आलो आहोत असं सांगत जास्त भाष्य करण्यास नकार दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!