मोठी बातमीः मान्सून आला……कधी पोहचणार तुमच्यापर्य़ंत…..

वेगवान मराठी
मुंबई, ता. 19 में 2024-
हवामान अपडेट : मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतील नागरिकांना कडक उन्हाचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील हवामानात चढउतार होत आहेत. अवकाळी पावसाने राज्यभर चांगलाच प्रभाव पाडला असून, अजून उष्णतेची तीव्रताही वाढली आहे. पुढील काही दिवस राज्यात हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
मौसमी पावसाची आतुरतेने वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच मान्सून भारतात दाखल होण्याची शक्यता आहे. येत्या ४८ तासांत मान्सून अंदमान-निकोबार तसेच बंगालच्या उपसागरातील वायव्य बेटांवर दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.
बायकोच्या गुप्तांगाला दोन्ही बाजून होल पाडून नवर-याने लावले कुलूप !
गेल्या आठवड्यापासून विदर्भासह राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना अवकाळी पावसाने झोडपले आहे. हवामान अंदाजानुसार, पुढील पाच दिवसांत विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस, विजांचा कडकडाट आणि ३०-४० किमी/तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
गर्भपात करण्यासाठी आलेल्या बायकांचा असा होता कोडवर्ड ….
कोकणात हवामान कसे असेल?
कोकणातील विविध भागात उष्ण आणि दमट वातावरण राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. याशिवाय, दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या विविध भागात वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस आणि वादळी वाऱ्याची शक्यता आहे.
मुंबईत काय परिस्थिती आहे?
मुंबई शहर आणि उपनगरांसाठी पुढील २४ तासांचा स्थानिक अंदाजानुसार आकाश बहुतांशी निरभ्र राहील. शहर व उपनगरे उष्ण व दमट राहतील, असा अंदाजही हवामान खात्याने वर्तविला आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३६ अंश सेल्सिअस आणि २८ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
राज्यातील या जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’
हवामान अंदाजानुसार, विदर्भात आजपासून पुढील पाच दिवस अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नागपूर, वर्धा, वाशिम आणि बुलढाणा वगळता सर्व जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. अमरावती, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांत वादळ आणि विजांचा कडकडाट होण्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने १९ मे ते २२ मे या कालावधीत विदर्भातील सर्व जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
