monsoon Update महाराष्ट्रात ढगफुटीचा पाऊस !मान्सून दाखल

वेगवान मराठी / रविंद्र पाटील
मुंबई, ता. 19 में 2024 – राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. कोकणात ढगफुटीसारखा पाऊस झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील अनारी गावात जोरदार पाऊस झाला आहे. हा मुसळधार पाऊस पाहून ग्रामस्थ भयभीत झाले. अवघ्या तासाभरात मुसळधार पावसाने येथील ग्रामस्थांचे दैनंदिन जनजीवन विस्कळीत झाले.
चिपळूण तालुक्यात पावसाच्या सरी कोसळल्या असून, असा पाऊस अनारी ग्रामस्थांनी प्रथमच अनुभवला. अनारी डोंगरात ढगफुटीसारख्या पावसाने शेतकरी हैराण झाला आहे. त्यामुळे नदीला पूर आला. मे महिन्यातील अवकाळी पावसाने शहरवासीयांना हैराण केले आहे. अनारी गावात पूल बांधण्याचे काम सुरू असून, त्यासाठीचे साहित्य पावसात वाहून गेले. या पावसामुळे अनेक रस्ते जलमय होऊन गावाचा संपर्क तुटला. येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनारी येथे अवघ्या एका तासात 110 मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे अनारी परिसरात ढगफुटी झाल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत.
बीड मध्ये हा समाज एकवटल्याने, कुणाचा होणार विजय, पंकजा की बजरंग बप्पा?
दरम्यान, मुंबई शहर आणि उपनगरात पुढील २४ तासांत जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे. 30 ते 40 किमी/तास वेगाने वारे वाहतील, ढगाळ आकाश आणि हलक्या ते मध्यम पावसाचा हवामान खात्याचा अंदाज आहे.
मान्सूनचे अंदमानात आगमन :
ज्या मान्सूनची सर्वांनाच प्रतीक्षा होती तो आज अंदमानमध्ये दाखल झाला आहे. मान्सून अंदमान-निकोबार, मालदीव आणि कोमोरिन भागात पोहोचला आहे. 31 मे पर्यंत मान्सून केरळच्या किनारपट्टीवर पोहोचण्याचा अंदाज आहे. 11 जून रोजी महाराष्ट्रात मान्सून दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यंदाच्या मोसमी पावसाचे प्रमाण सुमारे 106 टक्के असेल असाही अंदाज आहे.
महाराष्ट्रात वादळःगारपीट!वीजांचा कडकडाट व ढगांचा गडगडाट होणार!अलर्ट जारी
विदर्भात वादळी पावसाचा इशारा
येत्या दोन दिवसांत विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नागपूर आणि विदर्भात दोन दिवस यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने हा अंदाज वर्तवला आहे. मे महिन्याचा पहिला पंधरवडा उलटून गेला. मात्र, प्रखर सूर्यप्रकाशाऐवजी विदर्भात सतत अवकाळी पाऊस आणि गारपीट होत आहे.
