कन्नडः कुंटनखानावर पोलीसांचा छापा, दोघींची सुटका !

वेगवान मराठी / विजय चौधरी
कन्नड, ता. 21 में 2024 – छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड शहरातील निसर्ग सिटी येथे सुरू असलेल्या कुंटणखान्यावर सोमवारी (ता. २०) छत्रपती संभाजीनगर येथील मानवी तस्करीविरोधी कक्ष पथकाने सोमवारी दुपारी तीनला छापा मारून दोन पीडित महिलांची सुटका केली, तर कुंटणखानाचालकास अटक करून त्याच्याकडील पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
Monsoon Update मान्सूची हजेरी… मान्सून येत आहे! पण कोणत्या मार्गाने, घ्या जाणून
शहरातील निसर्ग सिटी येथे कुंटणखाना सुरू होता. कन्नड शहर पोलिसांना आणि छत्रपती संभाजीनगर मानवीतस्करी विशेष पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर, मानवीतस्करी विशेष पथकाच्या सहायक पोलिस निरीक्षक आरती जाधव, सुदाम सिरसाठ, नवनाथ कोल्हे, पोलीस अंमलदार रामेश्वर धापसे, वर्षा चेळेकर यांच्या पथकाने छापा मारला. निसर्ग सिटी येथील शीतल बिरारे यांच्या मालकीच्या घरात बनावट ग्राहकास पाठवून सापळा रचून आरोपीस रंगेहाथ पकडले. वेश्या व्यवसाय चालविणारा नासीर आसिफ शेख ऊर्फ गुड्डू (रा. निसर्ग सिटी) याला
मामाच्या मुलीसाठी सख्खे भाऊ भिडले, तिच्या मनातं कोण… वाचा..
ताब्यात घेऊन छत्रपती संभाजीनगर शहरातील दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली. या कारवाईत मोबाइलसह ५१ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. सहायक पोलिस निरीक्षक आरती जाधव यांच्या फिर्यादीवरून कन्नड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
छत्रपती संभाजीनगर ग्रामीण हद्दीत कोठेही देहव्यापार सुरू असल्यास तत्काळ पोलीस प्रशासनास कळवावे. आपले नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक आरती जाधव यांनी केले.
