महाराष्ट्र

मामाच्या मुलीसाठी सख्खे भाऊ भिडले, तिच्या मनातं कोण… वाचा..

मामाच्या मुलीसाठी सख्ये भावांत हाणामारी, तिचं प्रेम तिसऱ्यावरच

वेगवान मराठी / विजय चौधरी 

सोयगाव, ता. 21 में 2024 मुलगी पाहण्यासाठी आईसोबत दोन्ही तरुण मुले मामाकडे आली. मुलगी पसंत पडल्याने मोठ्या मुलाने होकार दिला; इतक्यात लहान भावालाही मनात धकधक झालं आणि आपल्यालाही ती पसंत असल्याचं त्यानं सांगितलं. आणि त्याने चक्क तिच्यासोबतच लग्नाची इच्छा व्यक्त केली. लहान भाऊ म्हणाला, की मी लग्न करेन तर तिच्याशीच. यानंतर या कहाणीत वेगळाच ट्विस्ट आला.

monsoon Update महाराष्ट्रात ढगफुटीचा पाऊस !मान्सून दाखल

याच कारणावरुन सख्ये दोन्ही भाऊ आपसात भिडले, आणि अगदी कपडे फाटेपर्यंत एकमेकांसोबत हाणामारी केली. मात्र, सगळ्यात मोठा ट्विस्ट तर नंतर आला. भावांची भांडणं पाहून मामाच्या मुलीनेही आपले पत्ते उघडले. शेवटी मुलीने आपले गल्लीतील एका मुलावर प्रेम आहे आणि मला त्याच्यासोबतच लग्न करायचं आहे. सांगता सर्वांना धक्काच दिला. ही घटना शनिवारी जामनेरात घडली.

बाहेरच्या राज्यातील रहिवासी असलेली बहीण शनिवारी जामनेरातील आपल्या भावाकडे मुलगी पाहण्यासाठी आली. सोबत तिची दोन तरुण मुलेही होती. बहिणीने मोठ्या मुलासाठी भावाकडे मुलीची मागणी घातली. मोठ्या मुलाला मुलगी पसंत पडली. इकडे लहान मुलाने आपणासही मामाची मुलगी पसंत असल्याचे सांगत तिच्याशी लग्न करायचा हट्ट धरला. यावेळी उपस्थित नातेवाइकांनी लहान भावाला समजावले; पण तो हट्टालाच पेटला.

बायकोच्या गुप्तांगाला दोन्ही बाजून होल पाडून लावले कुलूप !

मोठ्या भावाने लहान भावाची केली कपडे फाटेपर्यंत धुलाई :

दोन्ही भावांत वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. मोठ्या भावाने लहान्याची कपडे फाटेपर्यंत धुलाई केली. फाटलेल्या कपड्यांतच त्याने जामनेर पोलिस स्टेशन गाठले, त्याची समजूत काढत घरी आणले.

ती म्हणाली, गल्लीतील मुलासोबत लग्न करणार!

इकडे मुलीने मात्र दोघांपैकी कुणाशीच आपल्याला लग्न करायचे नाही. माझे गल्लीतील एका तरुणावर प्रेम आहे. त्याच्याशी मी लग्न करणार असल्याचे सांगत सर्वांना धक्काच दिला. मुलीचा निर्णय ऐकून पाहुणी म्हणून आलेली बहीण दोघा मुलांसोबत आपल्या गावाकडे रवाना झाली

जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे ही घटना घडल्यामुळे एक फुल दो माली अशीचं ही घटना चर्चेचा विषय बनली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!