क्राईम

सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न

सावकारखसह आणि त्याच्या तीन सहकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अकोला जिल्ह्यात सध्या पोलिसांचा धाक उरला की नाहीय?, असा प्रश्न उपस्थित करणाऱ्या अनेक घटना घडतायेत. अकोला जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेला वेशीवर टांगणारा एक व्हिडिओ सध्या ‘सोशल मीडिया’वर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ अकोला (Akola News) जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातल्या मनब्दा गावातला आहेत. सावकाराला शेतीचा (Farmer) ताबा घेण्यास विरोध करणाऱ्या युवकाला ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडण्याचा प्रयत्न सावकार आणि त्याच्या सहकाऱ्यांनी केलाय. 17 मे रोजीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे
मनब्दा गावातील गतमने कुटुंबीय आणि सावकार मंगेश आणि निलेश शेळके यांच्यात शेतीच्या ताब्यावरुन वाद (Farm Land Dispute) सुरु आहेत. हा वाद सध्या न्यायालयात असताना शेळके यांनी शेतीवर ताबा घेण्याचा प्रयत्न केलाय. या प्रयत्नाला विरोध करणाऱ्या गतमने कुटुंबीयांवर सावकार शेळके आणि त्यांच्या गुंडांनी हल्ला चढवला. यात संदीप गतमने (Sandeep Gatmane) याला ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहेय. तर वडील हरिभाऊ गतमने यांच्यावरही धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. याप्रकरणी तेल्हारा पोलीस स्टेशन मध्ये सावकारखसह आणि त्याच्या तीन सहकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

वयोवृद्ध शेतकऱ्याच्या पाठीवर धारदार शस्त्राने वार झाल्याने रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात
आपली जमीन वाचवण्यासाठी गतमाने कुटुंबीय जीव पणाला लावून गुंडांचा प्रतिकार करत होते. कोणत्याही परिस्थितीत ट्रॅक्टर पुढे सरकून द्यायचा नाही, या निर्धाराने ते पाय रोवून उभे राहिले होते. यावेळी सावकाराने पाठवलेल्या गुंडांनी संदीप गतमने यांना बेदम मारहाण केली. यावेळी त्यांचे वयोवृद्ध वडील हरिभाऊ गतमाने हेदेखील मागचा-पुढचा विचार न करता या भांडणात पडले. त्यावेळी एका गुंडाने त्यांच्या पाठीत धारदार शस्त्राने वार केला. त्यामुळे हरिभाऊ गतमाने यांच्या पाठीवर मोठी जखम झाली. या जखमेतून रक्त वाहत असल्याने हरिभाऊ गतमाने यांचे कपडे रक्ताने माखले होते. त्यांच्या दोन्ही हातांनाही दुखापत झाले आहे. त्यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी नेमकी कोणती कारवाई केली, याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!