बायको मिळत नसल्याने पोरं..झाली उदार ! बापाला केलं ठार

वेगवान मराठी / अरुण थोरे
छ.संभाजी नगर, ता. 24 मे् 2024 – .बाप लग्नासाठी मुलगी बघत नाही म्हणून दोन मुलांनी बापाचीच हत्या केल्याची धक्कादायक घटना संभाजीनगर जिल्ह्यातील वडगाव कोल्हाटी येथे घडली आहे.दोन्ही मुलांना पोलीसांनी ताब्यात घेतले असुन, त्यांचा वर हत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे कल्याणीनगर घडलेल्या प्रकरणात वेगळेच राजकारण !
सध्या मुलगी मिळत नसल्याने लग्न न जमणे ही खूप मोठी समस्या सर्व समाजामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहे.याच समस्येने ग्रस्त झालेल्या दोन तरुणांनी अगदीच टोकाची भूमिका घेऊन आपल्या जन्मदात्या बापाचा निर्घुण खून केल्याची घटना संभाजीनगर जिल्ह्यात घडली आहे. सदर घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून लग्न न जमणे ही मोठी समस्या झाल्याची चर्चा जनमानसात उमटताना दिसत आहे.
cyclone Update मोठं चक्रीवादळ धडकणार ! मान्सूनवर परिणाम ?
संभाजीनगर जिल्ह्यातील वडगाव कोल्हाटी येथे संपत वाहूळ (वय ४८) हे आपल्या कुटुंबासह राहतात त्यांचे दोन्ही मुलं पोपट वाहुळ (२८) व प्रकाश वाहुळ (२६) हे एका खाजगी कंपनीत काम करतात.दिनांक ८ मे रोजी संपत यांचा लहान मुलगा प्रकाश हा कामाहून आला त्याचे वडिलांसोबत काही बाचाबाची झाली. त्यातच त्याने आपल्या वडिलांना शिविगाळ करत बुटाने मारहाण केली, नंतर मोठा मुलगा घरी आला तो वडिलांना म्हणाला आमचे वय निघून चालले, आमचे लग्न कधी करता तसेच आम्हाला आमची जमीन वाटून द्या.
PM-Kisan शेतक-यांना मिळणारी पीएम किसान पेन्शन बंद होणार ?
यावर वडिलांनी तुम्ही नीट वागत नसल्याचा सांगितले. याचा राग आल्याने प्रकाश याने चाकूने वडिलांवर वार केले. संपत हे जीव वाचवण्यासाठी बाहेर पडले असता मोठा मुलगा पोपट यांने वडिलांना धरले व लहान मुलाने चाकुने सपासप वार केले. बाहेरील गोंगाट ऐकून भावकीतील लोक बाहेर आले व त्यांनी संपत यांना घाटी रुग्णालयात दाखल केले. संपत यांचा उपचारादरम्यान दिनांक २४ मे रोजी मृत्यू झाला.याबाबत पोपट व प्रकाश यांच्यावर जिवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणुन वाळुंज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता पोलीसांनी दोघां भावांना ताब्यात घेण्यात आले आहे.
आता बारमालकांना भरावा लागेल ५० हजार दंड
