राज्यात पाणीबाणी,धरणांतील पाणीसाठे संपण्याच्या बेतात

वेगवान मराठी / अरुण थोर
मुंबई, ता. 25
गेल्या वर्षी राज्यात बऱ्याच भागांमध्ये पाऊस न झाल्याने राज्यातील धरण क्षेत्रातील भागही तहानेने व्याकूळ झालेलायं. राज्यातील धरण साठे आटण्याच्या बेतात असल्याने मोठे पाणी संकट येण्याची स्थिती आहे. तर काही शहरांमध्ये २५ ते ३० दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्याने, बर्याच भागात पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.
सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न
राज्यात एकूण १३८ धरणे आहेत, या धरणांमध्ये एकवीस टक्केच पाणीसाठा राहिल्याची माहिती समोर येत आहे. विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र तीव्र पाणीटंचाईचा सामना करत आहे. ग्रामीण भागामध्ये जनावरांच्या चाऱ्याची मोठी समस्या उद्भवली आहे. एकंदरीत राज्यात पाणी-बाणी निर्माण झाल्याचे चित्र आहे.
बायको मिळत नसल्याने पोरं..झाली उदार ! बापाला केलं ठार
मागील काळात राज्यातील बऱ्याच भागात अवकाळी पाऊस झाला. मात्र असे असतानाही एकीकडे पाऊस होऊनही पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने विरोधाभास निर्माण झाला आहे. एकीकडे पिण्याचा पाण्याचा प्रश्न जटिल झालेला असताना फळबागा जतन करण्याचे मोठे आव्हान शेतकऱ्यांवर आले आहे.
cyclone Update मोठं चक्रीवादळ धडकणार ! मान्सूनवर परिणाम ?
याबाबत राज्य शासनाने तातडीने निर्णय घ्यावे.अशा पद्धतीचा सूर विरोधी पक्षाकडून आवळला जात आहे. राज्य सरकारने याआधीच दुष्काळासाठी उपाययोजना आखायला हव्या होत्या अशा पद्धतीने विरोधी पक्षाकडून बोलले जात असताना.
याबाबत शरद पवार म्हणाले की, पाण्याच्या टंचाईमुळे राज्यातील स्थिती चिंताजनक आहे. आपल्याकडे सर्वाधिक धरण आहेत मात्र त्या धरनांचे अवस्था अत्यंत वाईट आहे. अनेक धरणांचा पाणीसाठा शून्य झाला असुन, पुन्हा धरणे भरण्यासाठी ऑगस्ट ची वाट बघावी लागणार आहे. काही गावे चारा छावण्यांची मागणी करत आहे मात्र सरकार इकडे लक्ष देत नाही.
यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांनी दुष्काळाचा राजकारण करू नये अशी विनंती केली आहे.
दुष्काळावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माणसे व जनावरांच्या पाण्याला सर्वप्रथम प्राधान्य देण्यात येईल ज्या ठिकाणी चाऱ्याचा तुटवडा असेल तिथे चारा छावण्या उभ्या करण्यात येतील. जिथे पाण्याच्या टँकरची मागणी असेल त्या ठिकाणी तीन दिवसाच्या टँकर ने पाणी उपलब्ध केले जाईल.
जर पाऊस लांबल्यास राज्याला मोठ्या पाणी संकटाला सामोरे जावे लागणार आहे.
