कल्याणीनगर प्रकरणः सुरेंद्र अग्रवाल यास अटक आणि विशाल अग्रवाल यास 14 दिवसाची कोठडी
कल्याणीनगर प्रकरणः सुरेंद्र अग्रवाल यास अटक आणि विशाल अग्रवाल यास 14 दिवसाची कोठडी

वेगवान मराठी / रमेश जयस्वाल
पुणे, ता .25 में पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणात सुरेंद्र अग्रवाल अल्पवयीन मुलाचे आजोबा याने ड्रायव्हरला धमकवून दोन दिवस डांबून ठेवल्या प्रकरणी पुणे गून्हेशाखेने सुरेंन्द्र अग्रवाल यास आज अटक करून त्याच्या घराची झाडा झडती घेतली जात आहे• कल्याणीनगर अपघात प्रकरणी मुलाचे पाल
क विशाल अग्रवाल याला परत 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी कोर्टाने सुनावली • हे अपघात प्रकरण वेगळेच वळण घेत आहे • अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल याने त्यांचा ड्रायव्हरला घरात दांबून ठेऊन आणि धमकी दिली , गाडी तूच चालवत होता ते सांग तूला बंगला घेऊन देतो ,कोणासही मी तूला सांगीतले म्हणून सांगू नको नाहीतर मी तूला कूठलचेच ठेवणार नाही• तू दिलेली जबानी पलटू नको • ड्रायव्हरला दाबून ठेवल्या प्रकरणी त्या ड्रयव्हरने पोलिसात तक्रार दिली असता आज पुणे पोलीस गून्हे शाखेने सुरेंद्र अग्रवाल यास अटक करून त्याच्या घरची झडती घेण्यात येत आहे अल्पवयीन मुलाने अपघातात तरूण तरूणीचा बळी घेतला यात घरातीलच कुटूंब पुरावे मिटविण्याचा प्रयत्न करत आहे•
हा तपास योग्यरित्या लावण्या करिता पुर्ण पूरावे तातडीने गोळा करणे गरजेचे कारण हे प्रकरण येव्हढे साधे सोपे नाही •अग्रवाल कुटूंबाचे अंडरवर्ल्ड बरोबर लागेबांधे आहे• अंडरवर्ल्ड यांनी या प्रकरणात उडी घेतल्यास हे प्रकरण कोठल्या कोठे जाऊ शकते तसेच या अपघातात तरूण/ तरूणीचा मृत्यू झाला त्यांच्या कुटूंबियावर वर सुध्दा राजकिय किंवा अंडरवर्ल्ड गुन्हेगारांचा तसेच अग्रवाल कुटूंबाचा ड्रायव्हर यांच्यासह घरावर सुध्दा दबाव येऊ शकतो म्हणून हे प्रकरण पाहले तेव्हढे सोपे नाही यात अटक केलेले विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवाल यांना कोर्टाने लवकर सोडू नये अशी जनतेची प्रतिक्रिया आहे•सुरवातीलाच पोलीस विभागाने ढिलाई केली योग्य पुरावे न्यायालयात सादर केले असते तर या प्रकरणाला वेगळे वळण आले नसते •
परंतू जेथे कूंपनच शेत खाते तेथे कोणाचेच काही चालेना• असले अपघाताचे अनेक प्रकरणे आहेत अशा प्रकरणाला तेथेच दाबण्याचा प्रकार घडलेला आहे •कल्याणीनगर प्रकरण जास्त पांगले होते नाही तर हे सुध्दा प्रकरण पुलिस विभाग दाबण्याचा प्रयत्न करत होते याची पुर्व उजळणी झाली होती याचा मलीदा संबंधीता पर्यंन्त पोहचला होता परंतू राजकिय आकाव तांडव आणि पुणेकरांची दुरदृष्टी मुळे या प्रकरणास वेगळे वळन लागले आहे •
या प्रकरणात फार मोठा मलिदा वाटण्यात आला होता असे जनतेत चर्चीले जात आहे पुलीसांची कायद्याची कलमे, कागदपत्रे हेराफेरी ,कोनाच्यावर अपघात प्रकरण टाकण्यात येणार होते ,आणि या रहीश जाद्यांना वाचविणाचा प्रकार होणार होता • परंतू या अपघातात मरण पावलेले यूवक,यूवती यांचे नाव सुध्दा एकाही राजकरण्यांनी काढले नाही तसेच त्यांच्या कूटूंबियांना रूग्णालयातून त्यांची बॉडी सुध्दा लवकर मिळली नाही आणि एकाही राजकारण्यांनी त्याच्या कडे ढूकूनही पाहले नाही• सहानूभूती तर दाखविणे दूर ही एक पुणेकरांकरिता शोकांकिता आहे•
