राहुल ,सोनिया गांधी यांनी पहिल्यांदा पंजाला मतदान केले नाही!
राहुल ,सोनिया गांधी यांनी पहिल्यांदा पंजाला मतदान केले नाही!

वेगवान मराठी / अरुण थोरे
नवी दिल्ली, ता. 25 में
लोकसभेच्या सहाव्या टप्प्यातील मतदान सुरू असून सहाव्या टप्प्यात दिल्लीतील सर्व जागांवर मतदान होत आहे. गांधी कुटुंब ज्या भागात राहते तेथे काँग्रेसचा उमेदवार नसल्याने इंडिया आघाडीतील आम आदमी पार्टीच्या उमेदवाराला गांधी कुटुंबीयांना मतदान करावे लागणार असल्याने, गांधी कुटुंबीयांनी पहिल्यांदाच काँग्रेसच्या पंजा या चिन्हाचे बटन न दाबता झाडु या चिन्हाला मतदान केले आहे. Rahul, Sonia Gandhi did not vote for Panja for the first time!
Cyclone Remal ताशी 100 किमी वेगवाने येणारे चक्रीवादळ ठरणार घातकं?
नवी दिल्ली या मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीच्या दिग्गज नेत्या सुषमा स्वराज यांची मुलगी बासुरी स्वराज व आम आदमी पार्टी चे सोमनाथ भारती यांच्यात लढत असून तिथे काँग्रेसचा उमेदवार नसल्याने गांधी कुटुंबीयांनी पहिल्यांदाच बिगर काँग्रेसी उमेदवाराला मतदान केले आहे.
राज्यात पाणीबाणी,धरणांतील पाणीसाठे संपण्याच्या बेतात
दिल्लीतील नवी दिल्ली हा मतदारसंघ उच्चभ्रू म्हणून ओळखला जातो इथे सहा वेळा काँग्रेस व पाच वर्षे बीजेपीने जागा जिंकल्या होत्या. येथे मागील दोन टर्म बीजेपीच्या खासदार होता. ह्या मतदार संघात राष्ट्रपती भवन, संसद भवन, इंडिया गेट, सर्वोच्च न्यायालय, दिल्ली विश्वविद्यालय आदी महत्त्वाच्या इमारतींचा समावेश होतो.
बायको मिळत नसल्याने पोरं..झाली उदार ! बापाला केलं ठार
