पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याचे प्रमुख वैशिष्टय़
धनुभाऊ आणि मोहरक्या ठरले मेळाव्याचे सामनाविर

केशव मुंडे वेगवान मराठी परळी / दि-१४-१०-२४——विजयादशमीच्या दिवशी महाराष्ट्रातील प्रमुख 4 दसरा मेळाव्यानां परंपरांगत इतिहासाची आनेक वर्षाची परंपरा आहे परंतु काल बीड जिल्ह्यातल्या नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज यांनी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षण मेळावा आयोजित केला होता ! त्यामुळे भगवानबाबांच्या जन्मगावी सावरगाव येथील भगवान भक्ती गडावर प्रतिवर्षी होणाऱ्या पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यास नेहमी प्रमाणे लोकं येणार नाहीत आसे दावे प्रतिदावे आणि कयास लावण्यात येत होती परंतु विरोधक आणि तज्ञांचे आंदाज खोटे ठरवत भगवान भक्ती गडावर प्रतिवर्षी पेक्षा आधीकच्या संख्येणे जनसागर उसळला आणि पंकजा मुंडे यांनी इथेच पहिली लढाई जिंकुन मेळाव्याचे भक्ती स्वरुप दाखवुण महत्व स्पष्ट केले —–
@ पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब @
-मेळाव्याच्या निमित्ताने पंकजा मुंडे याच भगवान बाबांच्या परंपरेच्या आणि गोपीनाथ मुंडे यांच्या विचाराच्या एकमेव निर्विवाद वारसदार आसल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले तर सुजय विखे, लक्ष्मण हाके,यांच्यासह व्यासपिठावर उपस्थित आसलेल्या आठरा पगड जाती धर्माच्या प्रतिनिधीनीं पंकजा मुंडे यांनीच बहुजनांचे नेत्रत्व करावे आसे जाहीर पणे सांगितल्यामुळे पंकजा मुंडे यांच्या गोपीनाथ गड ते भगवान भक्ती गड मार्गातल्या आडथाळ्यांसह परळी ते वरळी मार्गातील काट्यांचे देखील फुलं झाल्यामुळे एकप्रकारे महाराष्ट्रातील बहुजन वंचित पिडत ते सर्वच जातीपातीच्या सर्वसमावेशक नेत्या म्हणुण त्यांच्या नेत्रत्वावर 2024 च्या दसरा मेळाव्या मध्यें निर्विवाद शिक्कामोर्तब झाले…
माजी खासदार प्रित्तम मुंडे,रासपाचे अध्यक्ष महादेव जानकर मा.खा.सुजय विखे,मा,आ,शिवाजी कर्डिले,मा.आ.सुरेश धस,आमदार मेघना बोर्डीकर,आ.बाळासाहेब आजबे,आ.नमिता मुंदडा,मा.आ.भिमराव धोंडे ओबीसी योद्धा नवनाथ वाघमारे यांच्यासह आठरापगड आणि बारा बलुतेदार समाजातील मान्यवरांनी पंकजा मुंडे यांचे कौतुक करुण त्यांच्या पुढील राजकिय वाटचालीस शुभेच्छा दिल्या परंतु यावर्षीच्या दसरा मेळाव्यास प्रथमच हाजेरी लावणाऱ्या धनुभाऊ आणि ओबीसीचा मोहरक्या लक्ष्मण हाके मास्तर या दोघांनी मैदान मारुण दसरा मेळाव्यातील उपस्थितांचे मने जिंकली…
@ धनंजय मुंडे आणि लक्षमन हाके ठरले पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याचे सामनाविर @
12 वर्षाच्या कालावधीत नंतर मला या दसरा मेळाव्यासाठी उपस्थित राहण्याची संधी मिळाली हे माझे भाग्यच समजतो आसे बोलुण धनंजय मुंडे यांनी भगवानबाबां गोपीनाथ मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्या जनतेच्या भावनांना हात घालत सावध सुरुवात केली,यावर जनतेमधुन मिळालेला उत्स्फुर्त प्रतिसाद पाहुण भगवानगडाच्या स्थापनेनाचा इतिहास सांगुण पंकजा मुंडे यांनी कोणत्याही संकटाला न जुमानता कठीण काळात देखील साथीला कोणी आहे का नाही याचा विचार न करता भगवान बाबांच्या परंपरेचे आणि मुंडे साहेबांच्या विचारांचे समर्थपणे जतन केल्याचे मोठ्या मनाने मान्य करुण पंकजा मुंडे यांचे जाहीर आभार मानले पुढे बोलताना त्यांनी मि पंकजा मुंडे यांना टोकाचा विरोध केला हे मान्य केले परंतु प्रती दसरा मेळावा घेतला नाही किंवा तसा विचार देखील मनाला शिवला नाही आसे शपथ घेऊण सांगत एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांच्या नारायण गडावरील मराठा आरक्षण मेळाव्या बद्ल नाव न घेता नविन पायंडे पाडणाऱ्या मेळाव्यां विषयी नापसंती व्यक्त केली या बरोबरच छत्रपती शिवाजी महाराज आणि साधुसंतांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊण कार्य केले आसल्याचे सांगत नविन दसरा मेळावे घेणारांना मर्यादा पुरुषोत्तम राम देखील माहिती आसला पाहीजे आसा खोच्चक सवाल केला…तर या पुढील संघर्षाच्या काळात आपण सर्वजन पंकजाताईच्या विचाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहीलात तर कोणीही आपल्या धेय्य आणि हाक्का पासुण वंचित ठेवु शकणार नसल्याचे सांगत ‘हम जब जब बिखरेंगे तब तब दुगनी रफ्तारसे निखरेंगे,या शायरीणे भाषणाची सांगता केली
@ प्रा.लक्ष्मन हाके मोहरक्या ची क्रेझ कायम @
ओबीसी योद्धा आणि ओबीसीचा मोहरक्या म्हणुण झालेली प्रा लक्ष्मण हाके यांची ओळख भगवान भक्ती गडावर वरील दसरा मेळाव्यात देखील प्रकर्षांने जानवली हाके सर भाषण करण्यासाठी उभे राहिल्या नंतर तरुणांच्या घोषणांचा उत्साह ओसांडुण वाहत होता जोपर्यंत मुंडे साहेबांची प्रतिमा आसलेला फोटो आणि भगवानबाबांची पताका हातामध्ये घेऊण उंचावली नाही तोपर्यत हाके सरांच्या घोषणा देणारी तरुणाई थांबली नाही या वरुण प्रा.लक्षमन हाके यांची ओबीसी च्या हाक्काची लढाई हि जनतेच्या मनातील आरक्षणाच्या असुरक्षीत भावनांचे प्रतिनिधीत्व करणारी आसल्याचे समजते..
यापुढे भगवान भक्ती गडावर होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील बिरोबा विदर्भातील सेवालाल महाराज आणि सावता महाराजांच्या दिंड्या येतील आणि या दसरा मेळाव्याचे स्वरुप आणखी भव्य-दिव्य करुण आठरापगड जातीधर्मातील वंचितपीडित लोकांच्या उर्जेच शक्तीपिठ पंकजा मुंडे यांच्या पाठीमागे उभं करुण मागास प्रवर्गातील जातीचा द्वेष करुण हिणतेच्या भावनेने पाहणाऱ्या आणि त्यांच्या ताटात माती कालवु पाहनाऱ्या जातीवादी शक्तीनां गाडुण टाकण्याचे आव्हाण लक्ष्मण हाके यांनी करुण उपस्थित जनसमुदायाचे मनं जिंकली तर पंकजा मुंडे यांनी माझं लाडकं लेकरु आसा उल्लेख करुण मोहरक्याच्या कार्याची पोहचपावती दिली…
एकंदरींत काय तर पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यावर प्रत्येक वर्षी कशाचे ना कशाचे सावट आसते यावर्षी देखील एकाच जिल्ह्यात एकाच वेळी आचानक कसलीही परंपरा आणि कोणतेही कारण नसताना तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे वारसदार सक्षम आसताना मेळाव्यासाठी अनेक गड किल्ले उपलब्ध आसताना आध्यात्मिक क्षेत्रातील पवित्र स्थळावर दसऱ्याच्या दिवशी भगवानबाबांच्या परंपरागत दसरा मेळाव्यासी साधर्म्य दाखवणारा मेळावा आयोजित केल्याने जाणिवपूर्वक आडथळा निर्माण करत आसल्याची भावना जनतेच्या मनात निर्माण झाली आणि त्यामुळे लोकांनी भगवान भक्ती गडाचा रस्ता धरत प्रचंड गर्दी केली ,
@ भगवानगड येथे धनंजय मुंडे यांनी भगवानबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन @
दसरा मेळाव्यास उपस्थित राहण्यापुर्वी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी भगवानबाबांच्या समाधीचे भगवानगडावर जाऊण दर्शन घेतले आणि ज्यांनी भगवानगडावर दसरा मेळावा आयोजित करण्यास पंकजा मुंडे यांना विरोध केला त्याच महंत नामदेव शास्त्री सानप यांचे भगवान भक्ती गडावर दसरा मेळाव्या ला उपस्थित राहण्यासाठी परवानगी स्वरुप आशिर्वाद घेतले यावरुण 10 वर्षापुर्वी पंकजा मुंडे यांनी घेतलेली भुमीका त्यांचा दुरदर्ष्टीपणा रास्त होता हे देखील काळानेच सिद्ध करुण दाखवले आहे…
एकीकडे भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री सानप यांनी भगवानबाबांच्या परंपरागत दसरा मेळाव्याची परंपरा बंद करुण तर दुसरीकडे नारायणगडाचे महंत शिवाजी महाराजांनी नारायण गडावर नविन पायंडा पाडुण आप आपल्या कारकिर्दीला वादाचे दाग लाऊण घेतले आहेत कारण दोन्ही महंतांकडे त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे ठोस कारणं नाहीत त्यामुळे आध्यातिमक क्षेत्रातील धार्मीक स्थळानां संकुचित कोषामध्ये ढकलणाऱ्या दोन्ही महंतांच्या भूमिकेवर सांप्रदायिक क्षेत्रातील नामवंत मंडळी आणि सर्वसामान्य भाविक भक्तांकडून प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.







