शेतात वीज पडली अन् जमिनीतून सुरु झाला निळ्या पाण्याचा प्रवाह, निळे पाणी पाहण्यासाठी गर्दी, पाहा Video

विजय चौधरी छत्रपती संभाजी नगर
वीज पडल्यानंतर शेतातून निळे पाणी का वाहू लागले? या प्रश्नाचे शोध घेण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सुरु करण्यात आला आहे. त्यासाठी भूगर्भ शास्त्रांची मदत घेतली जाणार आहे. अगदी गडद निळ्या रंगाचे हे पाणी वाहत आहे. धारशिव जिल्ह्यातील या प्रकारामुळे आश्चार्य व्यक्त केले जात आहे.
राज्यात अनेक भागात मान्सून पोहचला आहे. विजांच्या कडकडाटासह अनेक ठिकाणी पाऊस होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शेती कामांना वेग आला आहे. मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यात एक विचित्र घटना घडली. धारशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील मसला गावातील एका शेतात वीज पडली. त्यानंतर त्या शेतीतील जमिनीतून निळ्या रंगाचे पाणी वाहू लागले. भूगर्भतून निळे पाणी येऊ लागल्यामुळे ते पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली आहे. त्याचे व्हिडिओ काढून लोक सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत.
वीज पडल्यानंतर शेतातून निळे पाणी का वाहू लागले? या प्रश्नाचे शोध घेण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सुरु करण्यात आला आहे. त्यासाठी भूगर्भ शास्त्रांची मदत घेतली जाणार आहे. अगदी गडद निळ्या रंगाचे हे पाणी वाहत आहे. धारशिव जिल्ह्यातील या प्रकारामुळे आश्चार्य व्यक्त केले जात आहे. मराठवाड्यातील अनेक भागांत पाऊस सुरु झाला आहे. परंतु धारशिवमधील प्रकारची चर्चा सर्वत्र सुरु आहे
