छत्रपती संभाजी नगर
पेट्रोल भरतांना फोन वाजला आणि असं काही घडलं… तुम्हीचं पहा व्हिडीओ

वेगवान मराठी / विजय चौधरी
छ.संभाजी नगर, ता. 11 जून – छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज परिसरातील बजाज ऑटो गेट समोरील पेट्रोल पंपावर दुचाकी मध्ये पेट्रोल भरत असताना अचानक मोबाईल फोन वाजला अन पेट्रोल भरण्यासाठी उभ्या असलेल्या दुचाकीला अचानक आग लागल्याची घटना घडली.
परंतु यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, गाडीने अचानक पेट घेतल्याने पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली होती. प्रसंगावधान राखत दुकजाकीस्वारांनी व पेट्रोल पंपाच्या कर्मचाऱ्यांनी गाडी लोटत लांब नेल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. आणि आग विझवली.
