क्राईमबीड

कमरेला कट्टा अडकुण फिरणाऱ्या युवकास पोलीसांनी उचलला

Beed police pick up a young man with a revolver while walking around with a belt tied around his waist

पोलीस अधीक्षक कार्यालय,बीड
स्थानिक गुन्हे शाखा, बीड पिन 431122
दुरध्वनी क्रमांक 02442-227644
E-mail ID- sp.beed@mahapolice.gov.in
———————————————————————————–दिनांक 13/06/2025

गावठी कट्टा/पिस्टल बाळगणारा इसम स्था.गु.शा.बीड ने केला जेरबंद…


******************************************वेगवान मराठी प्रतिनिधी केशव डी मुंडे बीड

मा. पोलीस अधीक्षक, साहेब, बीड यांनी स्थानिक गुन्हे शाखा, बीड येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना अवैधरित्या गावठी पिस्टल बाळगणारे इसमानविरुद्ध कारवाई करणेबाबत आदेशीत केले होते.

त्यावरून दि. 12/06/2025 रोजी पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांना माहिती मिळाली की, एक इसम नामे जुबेर सय्यद हा त्याचे कमरेला गावठी कट्टा लावून शाहूनगर येथील हनुमान मंदिराचे बाजूला उभा आहे.

अशी खात्रीलायक माहिती मिळाल्यावरून पोलीस निरीक्षक बंटेवाड यांनी एक पथक सदर ठिकाणी पाठवून खात्री केली असता एक इसम तेथे मिळून आला.

त्याला त्याचे नाव गाव विचारले असता त्याने जुबेर जावेद सय्यद, वय 18 वर्ष रा. हनुमान चौक, शाहूनगर, बीड असे सांगितले.

पोलीस पथकाने त्याची अंगझाडती घेतली असता त्याचे कमरेला गावठी कट्टा मिळून आला.

सदर इसमाविरुद्ध पोलीस स्टेशन शिवाजीनगर गुरन 330/2025 कलम 3/25 शस्त्र अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास पोलीस स्टेशन शिवाजीनगर व स्थानिक गुन्हे शाखा करत आहे.

सदरची कामगिरी ही मा.पोलीस अधीक्षक श्री. नवनीत कॉंवत, मा.अपर पोलीस अधीक्षक श्री.सचिन पांडकर, पोलीस निरीक्षक श्री.शिवाजी बंटेवाड, यांचे मार्गदर्शनाखाली

पोउपनि श्रीराम खटावकर, पोह/अशोक दुबाले, सोमनाथ गायकवाड, पोना/ बाळु सानप, पोकॉ/अर्जुन यादव, अश्विनकुमार सुरवसे, चालक/सिध्देश्वर मांजरे, नेम. स्थानिक गुन्हे शाखा, बीड यांनी केलेली आहे.

( पोलीस अधीक्षक बीड यांचे कडुण प्रसिद्धि साठी
प्रति- संपादक वेगवान मराठी बीड केशव मुंडे 8888387622 )

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!