महाराष्ट्र

महाराष्ट्रात पुन्हा पावसाचे तांडवःफेंगल चक्रीवादळ वाट लावणार

Rain Update

वेगवान मराठी / एकनाथ भालेराव

पुणे, ता. 3  डिंसेबर 2024 Rain Update maharashtra  यंदा महाराष्ट्रात मुसळधराच्या पावसानं धिंगाणा घातला मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रातील अनेक नदी नाले दुथडी भरून वाहिले पाऊस असा बरसला की लोकांना पावसाला आता बस झालं रे बाबा असे म्हणण्याची वेळ आली.a-spell-of-rain-will-be-seen-in-maharashtra

पावसाने बरसण्यास काही कमी केलं नाही. मान्सूनच्या पावसाबरोबर परतीचा मान्सून सुद्धा जोरदार महाराष्ट्रात पडला. यामुळे अक्षरशः महाराष्ट्रात पाणी पाणी झालं. आता महाराष्ट्रावरती पुन्हा एक नवीन संकट येऊन ठेपलेला आहे. ते म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये उसळलेल्या फिंगर चक्रीवादळ आता या चक्रीवादळाचा फटका महाराष्ट्राला बसणार आहे. महाराष्ट्रामध्ये आता पाऊस पुन्हा दाणदान करणार असल्याचं अपडेट समोर आलेला आहे. हवामान खात्याने महाराष्ट्रात कशा पद्धतीने पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवलेला आहे जाणून घेऊया.

महाराष्ट्र मध्ये थंडी पडण्यास सुरुवात झाली होती दिवाळीनंतर थंडीने सुरुवात केली असली तरी अचानक कुठलेले या चक्रीवादळामुळे वातावरणामध्ये थोडासा गारवा कमी होऊन उष्णता निर्माण झालेली आहे थंडीचे दिवस असल्यामुळे थोडी थंडी जाणवत असली तरी मात्र वातावरणातली थंडी या चक्रीवादळामुळे कमी झाल्याचे दिसते.

भारताच्या दक्षिण किनारपट्टीजवळ ‘फेंगल’ चक्रीवादळ घोंगावतं आहे. या वादळाचा महाराष्ट्रातही फटका बसणार आहे. हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी याबाबतचा अंदाज व्यक्त केला आहे. राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झाल आहे. थंडी कमी झाली आहे. 6 डिसेंबरेपर्यंत राज्यातील विविध भागात अवकाळी पावसाचा अंदाज आहे, असं पंजाबराव डख म्हणालेत. ऐन थंडीत पाऊस पडणार असल्याने पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांना महत्वाचा सल्ला दिला आहे. कांदा, मका उत्पादक शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या शेतमालाला चांगले झाकून ठेवा, असं डख म्हणालेत.

हवामान विभागाने आता काही जिल्ह्यांना महाराष्ट्रामध्ये पाऊस पडण्याचा इशारा दिलेला आहे. महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस कोसळणार आहे. तो किती प्रमाणात आहे हे आपल्याला पहावं लागेल. कारण पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकाचा मोठा नुकसान होणार आहे. ज्या भागांमध्ये कांद्या व भाताचे चे पीक काढणीला आलेला आहे. त्या ठिकाणी पाऊस झाल्यास पिकाचे मोठे नुकसान होणार आहे.

 पंजाब डख म्हणतात या ठिकाणी पाऊस

फेंगल चक्रीवादळामुळे राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडू शकतो, असा अंदाज पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे. मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, परभणी, वाशिम, बीड, धाराशिव, लातूर या जिल्ह्यात पाऊस होणार आहे. तर विदर्भातील यवतमाळ, नागपूर, बुलढाणा, जालन्यात पावसाची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर, अहमदनगर तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, निफाड, मालेगाव, जळगाव या भागात अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे. 8 डिसेंबरपासून राज्यातील हवामान स्वच्छ होऊन पुन्हा थंडीला सुरूवात होईल, असंही त्यांनी सांगितलं आहे.

राज्यात थंडीचा जोर वाढत असताना आता पावसाचे आगमन होणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. तळ कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पुढील 3 दिवस हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. काही जिल्ह्यांना येलो अलर्ट सुद्धा देण्यात आला आहे.

हवामान खात्याकडून या ठिकाणी पाऊस 

मुंबई आणि छत्रपती संभाजी नगर येथील किमान तापमानात जास्त वाढ झाल्याने तेथील वातावरण दमट होण्याची शक्यता आहे. वातावरणात होणारे बदल बघता नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!