300 हून अधिक बँकांना सायबर हल्ल्याचा फटका, UPI-ATM सेवा ठप्प

देशभरातील सुमारे 300 छोट्या बँका आणि वित्तीय संस्थांचे बँकिंगशी संबंधित काम ठप्प झाले आहे. एटीएममधूनही ग्राहकांना पैसे काढता येत नाहीत. त्याचबरोबर UPI द्वारे रक्कम ट्रान्सफर करताना अडचणी येत आहेत. सहकारी बँका आणि ग्रामीण भागातील बँकांवर याचा विशेष परिणाम झाला नाही. मात्र शहरी आणि निमशहरी भागात आणि ज्या बँका या सर्व्हरवर पूर्णपणे अवलंबून आहेत त्यांना मात्र याचा मोठा फटका बसला आहे
सी-एज टेक्नॉलॉजीज मागच्या दोन दिवसांपासून यावर काम करत असल्याची माहिती मिळाली आहे. मोठ्या पेमेंट सिस्टमच्या सुरक्षेसाठी सी-एज सिस्टम वेगळी करावी लागली. ग्राहकांचे पैसे कुठेही जाणार नाहीत याची खबरदारी घेत आहोत. इंडियन नॅशनल को-ऑपरेटिव्ह युनियनचे अध्यक्ष दिलीप संघानी यांनी दिलेल्या माहितीनुसार गुजरातच्या 17 जिल्हा सहकारी बँकांसह देशभरातील साधारण 300 बँकांवर त्याचा मोठा परिणाम झाला आहे.
रॅनसमवेयर व्हायरस हा लॅपटॉप, कंम्प्युटर अथवा सिस्टिममध्ये घुसून सगळी माहिती काढून घेतो. यामध्ये तुमचा पासवर्ड, युजरआयडी देखील हॅकरकडे जातात. यामध्ये फाइल एन्क्रीप्टेड करण्याची क्षमता असता. डेटा, अॅक्सिस पुन्हा देण्यासाठी हॅकर्स मोठी रक्कम मागतात.
मे 2017 मध्ये, WannaCry ransomware ने जगभरातील डझनभर देशांवर हल्ला केला. यामध्ये 2 लाखांहून अधिक यंत्रणा ठप्प झाल्या होत्या. यात भारताचाही समावेश होता. हॅकर्सनी पूर्ण सिस्टिम लॉक करून 300 ते 600 डॉलर्स मागितले होते. या हल्ल्यात अमेरिकन आरोग्य यंत्रणेला सर्वात मोठा फटका बसला होता.
