जालणाःप्रवाशांनी भरेलील टॅक्सी थेट विहीरीत, अनेक प्रवासी पाण्यात डुबले मोठी बातमी
जालणाःप्रवाशांनी भरेलील टॅक्सी थेट विहीरीत, अनेक प्रवासी पाण्यात डुबले मोठी बातमी

वेगवान मराठी / विजय चौधरी
जालनाः दि . 18 जुलै 2024 – जालन्याजवळ प्रवाशांनी भरलेली काळी-पिवळी टॅक्सी विहिरीत पडून पाच जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जालना-राजूर महामार्गावर तुपेवाडी कांट्याजवळ ही दुर्घटना घडली.
जालना-राजूर महामार्गावरील तुपेवाडी कांट्याजवळील वसंतनगर तांडा येथे काळी-पिवळी टॅक्सी विहिरीत पडल्याने सहा प्रवाशांचा बुडून मृत्यू झाला. अजूनही सहा ते सात जण विहिरीत अडकल्याचा स्थानिक नागरिकांचा अंदाज आहे.
मृतांमध्ये चार जण बदनापूर तालुक्यातील चनेगाव येथील असल्याची माहिती आहे. काळी-पिवळी टॅक्सी जालन्याहून राजूरकडे प्रवाशांना घेऊन जात असताना महामार्गावरील एका विहिरीजवळ चालकाचा ताबा सुटला. टॅक्सीत एकूण 13 प्रवासी होते.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी विहिरीकडे धाव घेतली. विहिरीतून काळी-पिवळी टॅक्सी काढण्याचे प्रयत्न सुरू झाले. विहिरीतून आतापर्यंत सहा मृतदेह बाहेर काढण्यात आले असून अजूनही सहा ते सात जण आत असल्याची भीती असताना बचावकार्य सुरू आहे. राजूर पोलीस आणि स्थानिक नागरिक घटनास्थळी शोध घेत आहेत.
