नांदगाव-पाचकोटी खर्च झाले; मुदत संपली, आता पाण्यासाठी फक्त तारिख पे तारिख..
पाचकोटी खर्च झाले; मुदत संपली, आता पाण्यासाठी फक्त तारिख पे तारिख..

वेगवान मराठी / मारीत जगधने
नांदगाव, नाशिक: 8 सप्टेंबर 2024- मागील वर्षी नांदगांव तालुक्यात दुष्काळ असल्याने साकोरा गावाला पाणी टंचाई जानवु नहे म्हणून आमदार सुहास कांदे यांनी सुमारे पाच कोटी रुपयांची जलजिवन मिशन योजना मंजूर करुन दिली निधी प्राप्त झाला योजनेच्या कामाला दिडवर्षे झाले काम सुरु व्हायला पण उन्हाळा पावसाळा गेला पण सोकोरा गावाला आजुन पाणी आले नाही योजनेचा कालावधी पूर्ण झाला पण काम आजुन झाले नाही.एप्रिल २०२४ मध्ये काम पूर्ण करण्याची मुदत होती अखेर एप्रिल फुल ठरला .
ठेकेदार तारीख पे तारीख देत आहे आत्ता पर्यंत तिन वेळा मुदत वाढवून घेतली पण आजुन काय ठेकेदाराल काम पूर्ण करण्याचे मुहूर्त सापडले नाही. या संदर्भात नागरीकानी आमसभा घेऊन ठेकेदाराला जाब विचारला? पाणी चाचणी घेताना जलवाहिनी ठिकठिकाणी फुटतात यामुळे कामाचा दर्जा कसा असेल यावर नागरीकाच्या उलटसुलट प्रतिक्रिया उमटतात.
तालुक्यातील साकोरा येथे गेल्या दीड वर्षापासून शासनाच्या जलजीवन मिशन योजनेंतर्गत गिरणाडॅम ते साकोरा सुमारे १४ किमी अंतराची नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर झाली मात्र संबंधित ठेकेदाराच्या हलगर्जीपणा मूळे गावाला अजूनही पाणी मिळत नसल्याने झालेल्या ग्रामसभेत पाणी प्रश्न चांगलाच पेटल्याचे पहायला मिळाले.
उन्हाळयात तर नागरिकांनी विकत पाणी घेतले परंतु पावसाळ्यात देखील पाणी विकत घेण्याची वेळ नागरिकांवर आल्याने साकोरा गावातील पाणीप्रश्न बिकट होत चालला असून प्रशासनाने गंभीर दखल घेऊन पाणी पुरवठा लवकरात लवकर सुरळीत करावा अशी मागणी करत ग्रामसभेत नागरीकांनी एकच हल्ला बोल केला.
साकोरा हे गांव १५ हजार लोकवस्तीचे आहे गावाला शुध्द व मुबलक पाणी मिळाले या साठी शासन स्तरावर जलजिवनमिशन पाणी योजना मुंजुर करण्यात आली त्यासाठी सुमारे पाच कोटी निधि खर्ची घातला योजना पूर्ण करणयाचा कालावधि संपुष्टात आल. पण आजुन काय साकोरा गावाला ठेकेदार पाणी पाजत नाही या उलट तोंडाला पाणे पुसत आहे तसे गांव देखील सहनशील आहे याचा फायदा ठेकेदार घेत आहे.
उन्हाळ्यात प्रचंड हाल सोसले गावाने आता पावसाळा संपत आला पण पाणी काय मिळाना शासन प्रशासनाच्या व ठेकेदाराच्या कारभाराला जनता कंटाळली आहे.आंदोलने केली उपोषने केली पण शासन प्रशासन काय जुमाना आता येत्या निवडनुकीत बघूया काय? करावे ते असा सुरु जनमानसात उमटतो .जलजिवन मिशन योजनेसाठी नागरीकानी ग्रांमपंचायत साकोरा कार्यालयात बाहेर मोकळ्या जागेत ग्रामसभा घेऊन पाणी योजनेचे काय झाले असा खडा सवाल ग्रंमसभेत. ठेकेदाराल विचारला .
गिरणाधरणातुन हि योजना उभी केली धरणात मुबलक पाणी आहे पण नागरीकाना पिण्यासाठी अद्याप पाणी मिळत नाही पाच कोटी खर्ची गेले पण आजुन एक थेंब पाणी नळाला आले नाही महिला संताप व्यक्त करात.
