
वेगवान मराठी / एकनाथ भालेराव
नवी दिल्ली, ता. ( आनलाईन डेक्स ) – युट्यूबवरील व्हिडिओ पाहून डॉक्टरांनी ऑपरेशन केले आणि पाठोपाठ मुलाला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना बिहारच्या सारण जिल्ह्यातील मढौरात घडली आहे. विशेष म्हणजे ऑपरेशननंतर डॉक्टर आपले क्लिनिक बंद करून पळून गेला आहे.
संबंधित डॉक्टर बोगस असल्याचा आरोप मुलाच्या कुटुंबीयांनी केला आहे. गोलू साह (१५) असे दुर्दैवी मुलाचे नाव असून अजित कुमार पुरी असे डॉक्टरचे नाव आहे. गोलू याला उलट्या आणि पोटदुखीचा त्रास होत होता. धर्मबागी मार्केटमधील गणपती सेवा सदन येथे त्यास दाखल करण्यात आले. तेथे यूट्यूबवरील व्हिडिओ पाहिल्यानंतर डॉक्टरने मुलाच्या पोटाचे ऑपरेशन केले. ऑपरेशनदरम्यान त्याची प्रकृती चिंताजनक होऊन नंतर त्याचा मृत्यू झाला. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून क्लिनिकची तपासणी केली. मुलाचा मृतदेह ताब्यात घेतला आणि विच्छेदनासाठी पाठवून दिला. मुलाच्या
मृत्यूनंतर हळहळ व्यक्त होत आहे. मुलाचे आजोबा प्रल्हाद प्रसाद
साह यांनी सांगितले की, गोलू याला उलट्या आणि पोटदुखीची तक्रार होती. क्लिनिक चालवणारा डॉ. अजित कुमार पुरी याने आमच्यापैकी कुणालाही न सांगता आणि कुटुंबीयांची परवानगी न घेता गोलूचे ऑपरेशन केले.
यूट्यूबवर पाहून डॉक्टर ऑपरेशन करत असल्याचा आरोपही कुटुंबीयांनी केला आहे. यावेळी डॉक्टरने मुलाच्या वडिलांसह कंपाउंडरला डिझेल आणण्यासाठी पाठवले होते. गोलूच्या पोटात प्रचंड दुखू लागल्यावर आजोबा प्रल्हाद यांनी डॉक्टरला याबाबत माहिती दिली. यावर डॉक्टरने त्यांना खडसावले आणि मी डॉक्टर आहे की तुम्ही, असा प्रश्नही विचारला होता. वाटेतच मुलाचा मृत्यू
ऑपरेशन दरम्यान मुलाची प्रकृती
बिघडल्यावर डॉक्टरने स्वतः मुलाला रुग्णवाहिकेत बसवले. सोबत मुलाच्या आजीलाही घेतले आणि पाटणा येथील रुग्णालयात हे सर्वजण निघाले होते. तथापि, पाटण्याला जात असताना वाटेतच मुलाचा मृत्यू झाला. यानंतर मृतदेह तेथेच टाकून डॉक्टर पुरी आपल्या बॅगसह पळून गेला. तिथून त्याची आजी अतिशय कष्टाने नातवाचा मृतदेह घेऊन परतली.
सारणचे पोलिस अधीक्षक डॉ. कुमार आशिष यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबीयांच्या
जबाबावरून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोगस डॉक्टर आणि त्याच्या क्लिनिकमधील कर्मचाऱ्यांना अटक करण्यासाठी छापे सत्र सुरु केले आहे
