
केशव मुंडे वेगवान मराठी परळी बीड
पाटोदा दिनांक-१६-१०-२०२४ रोजी बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील चुंबळी ग्रामपंचायत कार्यालयात एका निंदणीय घटणेचा व्हिडिओ सध्या सोशल साइटवर व्हायरल होत आहे यामध्ये एका वयस्कर व्यकतीला महिला आणि काही लोकांकडुण आंगातील कपडे फाटे पर्यंत मारहाण करत आसल्याचे दिसत आहे,
आता पर्यंत सदरील घटणेतील प्रत्यक्षदर्शी उपस्थितां कडुण मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नागरीक आणि पुढारी आसलेल्या गोरख झेंड यांनी चुंबळी ग्रामपंचायत च्या विविध शासकिय कामां मध्ये ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थानां विश्वासात न घेता मनमानीपणे सुरु आसलेल्या गैर व्यवहाराच्या कारभारा विरोधात पंचायत समिती पाटोदा येथे काही दिवसांपूर्वी हजामत करो आंदोलन केले होते त्यानंतर पंचायत समितीचे अधिकारी 16 -10.24 बुधवार रोजी चौकशी साठी चुंबळी ग्रामपंचायत या ठिकाणी आले आसता संबंधीत महिला सरपंचावर गोरख झुंड यांनी केलेल्या आरोपाशी संबंधीत गुन्हे पुराव्यांसह उघड झाले अनियमित कारभार, इतर ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेणे या सारखे सबळ पुरावे मिळाल्यामुळे याचा राग मनात धरून चुंबळी येथील महिला सरपंच कु डॉ.रेश्मा हनुमंत पवळ यांनी व इतर काही महिलांनी संगनमताने ठरवुण गोरख झेंड यांच्या वर हल्ला केला आसल्याची प्राथमीक माहीती वेगवान मराठीस प्राप्त झाली आहे
कोण आहेत गोरख झुंड
मागील अनेक वर्षापासुण सुशिक्षीत बेरोजगार, महिला,युवती शाळकरी विद्यार्थी, वंचित शोषित पिडित अल्पसंख्याक समाजाला न्याय मिळवून देण्या साठीच्या 30 वर्षापासुणच्या कार्या बद्दल त्यांना पाटोदा परिसरात आंबेडकरी चळवळीतील पुढारी म्हणुण ओळखले जाते
याच चुंबळी गावातील दलित समाजातील सुज्ञ नागरीक ग्रामपंचायत ला काही माहिती विचारायला गेले तर सवर्ण समाजातील स्वतः स प्रतिष्ठीत समजुण घेणाऱ्या त्या उच्चविद्याविभूषित महिला सरपंचास ते रूचत आणि सहन होत नसल्याचे सांगितल्या जात आहे..
या प्रकरणाची माहिती दलित समाजातील बांधवानीं ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांना दिली आसुण त्यांनी पाटोदा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करून घेण्यात यावी म्हणून दुरध्वनी केला आसल्याचे समजते

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.