निवडणुकीत पैशाचा काळा बाजार रोखण्यासाठी आयकर विभागाचा हेल्पलाइन नंबर जाहीर
माहिती देण्याचे आयकर विभागाचे जनतेला आव्हाण

काळा पैसा वापरला जात असल्यास माहिती देण्याचे आयकर विभागाचे आवाहन
बीड दि. 17 वेगवान मराठी (केशव मुंडे ) : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये काळा पैसा वापरला जात असल्याची माहिती, रोख रकमेचे वाटप, रोख रकमेची हालचाल याबाबत विश्वसनीय माहिती असल्यास ती नि:संकोचपणे द्यावी, असे आवाहन नागपूरच्या आयकर प्रधान संचालक कार्यालयाचे आायकर उपसंचालक (तपास) अनिल खडसे यांनी केले आहे. माहिती देणाऱ्याची ओळख गुप्त ठेवण्यात येईल, असेही त्यांनी म्हटले आहे.
माहिती पाठविण्यासाठी टोल फ्री क्रमांक 1800-233-0355, 1800-233-0356, छायाचित्रे, व्हिडिओ इत्यादी पाठविण्यासाठी व्हाटसअप क्र. 9403390980, इमेल nagpur.addldit.inv@incometax.gov.in, nashik.addldit.inv@incometax.gov.in आहेत. निवडणुकी दरम्यान काळ्या पैशांचा वापर रोखण्यासाठी प्राप्तीकर विभागास सहकार्य करावे, असेही त्यांनी आवाहन केले आहे.

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.